शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

१२३ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST

जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी एक रुग्ण जिल्ह्याला धोक्यात आणू शकतो. त्यामुळे कोणताही धोका पत्करू नका. घरातील एकाच सुदृढ नागरिकांनी बाहेर पडून जीवनावश्यक वस्तू घरी घेऊन जाव्यात. केशरी शिधापत्रिकाधारकांना २४ एप्रिलपासून मे महिन्याचे धान्य वाटप होत आहे. प्रतिव्यक्ती आठ रुपये दराने तीन किलो गहू व प्रतिव्यक्ती १२ रुपये दराने दोन किलो तांदूळ वितरित केल्या जाणार आहे.

ठळक मुद्दे७८ पैकी ७७ नमुने निगेटिव्ह : २४ एप्रिलपासून केशरी शिधापत्रिकाधारकांनाही धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला १४ दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाइनला (इन्स्टिट्यूशनल) ठेवणे सुरू केले आहे. जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. ७८ पैकी ७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. १२३ लोकांना सध्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात गरीब निराश्रित यांच्या अन्नधान्य पुरवठासोबतच २४ एप्रिलपासून केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांनादेखील अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे.जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडीओ संदेशद्वारा बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी संपर्क साधला आहे. रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहने आणू नका. पुढील ३ मेपर्यंत लॉकडाऊन काटेकोरपणे पाळा आणि प्रशासनाचे कान डोळे होत बाहेरून येणाºया प्रत्येक नागरिकाची माहिती द्या, असे आवाहन त्यांनी आजच्या ताज्या व्हिडिओमध्ये केले आहे.जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी एक रुग्ण जिल्ह्याला धोक्यात आणू शकतो. त्यामुळे कोणताही धोका पत्करू नका. घरातील एकाच सुदृढ नागरिकांनी बाहेर पडून जीवनावश्यक वस्तू घरी घेऊन जाव्यात. केशरी शिधापत्रिकाधारकांना २४ एप्रिलपासून मे महिन्याचे धान्य वाटप होत आहे. प्रतिव्यक्ती आठ रुपये दराने तीन किलो गहू व प्रतिव्यक्ती १२ रुपये दराने दोन किलो तांदूळ वितरित केल्या जाणार आहे.मोबाईल रिचार्जची दुकाने उघडणारप्रिपेड मोबाईलधारकांना संपर्कामध्ये बाधा येऊ नये, यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयानुसार मोबाईल रिचार्ज प्रतिष्ठाने सुरू करण्यात येत आहे. सोबतच हार्डवेअरची दुकानेसुद्धा उघडण्यात येत आहे. गुरुवारपासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने उघडी असतील.महाराष्ट्र दिनाला केवळ झेंडावंदन१ मे रोजी येणाºया महाराष्ट्र दिनाला यावर्षी अन्य सण-उत्सवाप्रमाणेच अत्यंत साध्या व मोजक्या उपस्थितीत फक्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झेंडावंदन केले जाणार आहे. अन्य ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.भाजीपाला, धान्य मुबलककृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ९० टेम्पोमधून १५२७ क्विंटल भाजीपाल्याची थेट आवक झाली आहे. तसेच २३ टेम्पोमधून ६२३ क्विंटल फळांची आवक झाली आहे. तीन ट्रकमधून ८०३ क्विंटल कांदा, बटाटयाची आवक झाली आहे. तर ६२३ टेम्पो व १३ ट्रकमधून १२०१६.५१ क्विंटल अन्नधान्य इत्यादींची आवक झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली आहे.७२० वाहनांवर कारवाईनियमांचे पालन न करणाºया नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करीत जिल्ह्यातील २०७ प्रकरणात एकूण १२ लाख १४ हजार ९७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाºया ५६ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर ७२० वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.सिमेंट कारखाने सुरूचंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राट्रेक, एसीसी, माणिकगड, अंबुजा, या प्रसिद्ध सिमेंट कंपन्यांच्या पाच प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. एक-दोन दिवसात या ठिकाणी पुन्हा सिमेंट उत्पादनाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. याशिवाय जिल्ह्यातील १४ उद्योजकांनी आपले उद्योग सुरू करण्याला परवानगी मागितली आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी जिल्हा प्रशासनाकडून व राज्य शासनाकडून दिल्या जात आहे. आणखी काही उद्योग व्यवसायाला जिल्ह्यांमध्ये सुरुवात होईल, अशी अपेक्षा जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या