शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

१२ हजार हेक्टर क्षेत्राला मिळाले सिंचन

By admin | Updated: September 26, 2016 01:16 IST

राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाने चंद्रपूर जिल्ह्यातही आशादायक चित्र निर्माण केले आहे.

जलयुक्त शिवार अभियान : ३२ उपाययोजनांद्वारे सिंचनवाढचंद्रपूर : राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाने चंद्रपूर जिल्ह्यातही आशादायक चित्र निर्माण केले आहे. या अभियानातून तब्बल १२ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ३२ प्रकारच्या उपाययोजना केल्या. त्यामुळे यावर्षीच्या पावसाचे पाणी जमा होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. याशिवाय अभियानामुळे अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे.जिल्ह्यात १९७७ दगडी बंधारे घालण्यात आले आहेत. त्यातून १०५ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला. १३६० गॅबियन स्ट्रक्चरचे काम करण्यात आले आहे. त्याकरिता १ कोटी १२ लाख ८३ हजार रुपये खर्च करण्यात आले. सहा ठिकाणी माती नाला बांध घालण्यात आले आहेत. त्यातून ४४.८६ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होऊन २० हेक्टर जमिनीला सिंचन करणे शक्य झाले. ३२ माती नालाबांधाची दुरूस्ती करून १०२ हेक्टरचे सिंचन करण्यात आले. या अभियानात १२ हजार ३६६ हेक्टरवर ३१२ ढाळीच्या बांधांची कामे करण्यात आली आहेत. त्यापैकी ७९६४ हेक्टर क्षेत्रातील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यातून १०२५.७५ हेक्टर क्षेत्रामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. ७७० बोडींचे नूतनीकरण व खोलीकरण करण्यात येत असून ७५२ कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे ६५३.६२ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला. या बोडींमुळे ३९८.३५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. १३ साठवण बंधाऱ्यांची कामे घेण्यात आली. त्यामुळे ४४७.२६ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा तयार झाला. या पाण्यातून ८९४.५२ हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. ३३२ सिमेंट नाल्याच्या बांधामुळे १३८७.३९ हेक्टरला सिंचन झाले. १७८ तलावाच्या खोलीकरणातून ९५४.३ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करणे शक्य झाले. याशिवाय कोल्हापुरी बंधारे, विहिरींचे पुनर्भरण, तुषार सिंंचन-ठिबक सिंचनाची कामे, उपसा सिंचन योजना, लघु पाटबंधारे पाझर तलाव दुरूस्ती, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती आदी कामे करण्यात आली आहेत.सर्वाधिक २०२० शेततळ्यांची कामेजिल्ह्यात सर्वाधिक कामे शेततळ्यांची करण्यात आली आहे. तब्बल २ हजार २० शेततळ्यांचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी १७६१ शेततळ्यांचे काम सुरू करून १७१३ शेततळी पूर्ण झाली आहेत. ४८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून २२६२.४७ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. त्यातून १ हजार ७६ हेक्टर शेतीला सिंचन उपलब्ध झाले आहे. या सर्व कामांवर आतापर्यंत १२ कोटी ८८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. गाळ काढल्यामुळे सर्वाधिक सिंचन जलयुक्त शिवार योजनेत कृषी विभागाने ३२१ गाळ काढण्याची कामांपैकी ३०५ कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे तब्बल २६०४.१९ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आहे. त्याखालोखाल मजगी वा भातखाचऱ्यांच्या कामांमुळे सिंंचन निर्माण झाले आहे. ही ५४७ कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी ५५२ मजगीची कामे पूर्ण झाली आहेत. मजगी करण्यासाठी ७ कोटी ६८ लाख ७६ हजार रुपये खर्च करण्यात आले. त्या माध्यमातून तब्बल २४९०.२९ टीएमसी पाणीसाठा तयार करणे शक्य झाले. परिणामती १८७१.८९ हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली आली आहे. २७५ मजगींचे पुनरूज्जीवन करण्यात आले. गेल्या वर्षीची शिल्लक कामे धरून ३११ मजगींचे पुनरूज्जीवन करणे शक्य झाले. त्याद्वारे ५३१.८९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.