शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांकडून १२ मोटारसायकली जप्त

By admin | Updated: October 4, 2015 01:53 IST

चंद्रपूर शहर पोलिसांनी २९ सप्टेंबरला अटक केलेल्या दोन भावंडांकडून १२ दुचाकी वाहने जप्त केली असून अजून काही चोरीतील मोटारसायकल पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एक होता तडीपार : भावाच्या मदतीने सुरू होती चोरीचंद्रपूर: चंद्रपूर शहर पोलिसांनी २९ सप्टेंबरला अटक केलेल्या दोन भावंडांकडून १२ दुचाकी वाहने जप्त केली असून अजून काही चोरीतील मोटारसायकल पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल चंद्रपूर, बल्लारशाह, राजुरा, नागपूर येथून चोरण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी व ठाणेदार सुनिल ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंदरे, पोलीस उपनिरीक्षक विवेक देशमुख, जमादार खेमेकर, नायक पोलीस शिपायी संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, लवली शर्मा, उमेश वाघमारे, अफसर खान पठाण, किशोर तुमराम व डी.बी.पथकातील कर्मचाऱ्यांनी २९ सप्टेंबरला चंद्रपुरातील रहिवासी असलेल्या प्रशांत झाडे व त्याचा भाऊ प्रतिक झाडे या दोघांना अटक केली होती. यातील प्रतिक झाडे हा तडीपार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या काही महिन्यांपासून त्याचा भाऊ प्रशांत झाडे याच्या मदतीने चंद्रपूर शहरासह बल्लारपूर, राजुरा नागपूर येथून अनेक दुचाकींची चोरी केली. त्याची कबुलीही या चोरट्यांनी पोलिसांपुढे दिली आहे.गेल्या पाच दिवसांत पोलिसांनी केलेल्या चौकशीत नागपूर येथून चोरलेली पॅशन प्रो (एम.एच.३४-एस३०३४), हिरोहोंडा सीबी झेड (एम.एच.३४-२७४५), एक विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकल, नागपूर येथून चोरलेली बुलेट (०८८८), काळ्या रंगाची करिश्मा झेड, नागपूर येथून चोरलेली प्लेझर मोपेड (एम.एच-४० यू ४५२८), नागपूर येथून चोरलेली हिरोहोन्डा स्प्लेंडर, राजुरा येथून चोरलेली यामाहा मोटारसायकल, चंद्रपूर येथून चोरलेली बुलेट मोटारसायकल, चंद्रपूर येथील घुटकाळा परिसरातून चोरलेली करिष्मा मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात आरोपींविरुद्ध भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल लंपास करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्याच्या तक्रारीही पोलीस ठाण्यात झाल्यात. (प्रतिनिधी)