शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

11 लाख 94 हजार नागरिक आरोग्याबाबत बेफिकिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 23:19 IST

कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने मोफत डोस देण्याची मोहीम सुरू केली.  ही मोहीम आता ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपणार आहे. त्यानंतर मात्र नागरिकांना खासगी रुग्णालयात ४०० रुपये देऊन प्रिकॉशन डोस घ्यावा लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी शासकीय संस्थेतून त्वरित मोफत प्रिकॉशन डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आता शेवटची संधी दिली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत १५ जुलै ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत नागरिकांना मोफत प्रीकॉशन डोस देणे सुरू आहे. मात्र, अजूनही ११ लाख ९४ हजार ३० नागरिकांचा प्रिकॉशन डोस घेतला नाही. मोफत डोससाठी  आता केवळ १४ दिवस शिल्लक राहिल्याने नागरिकांनी तातडीने डोस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने मोफत डोस देण्याची मोहीम सुरू केली.  ही मोहीम आता ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपणार आहे. त्यानंतर मात्र नागरिकांना खासगी रुग्णालयात ४०० रुपये देऊन प्रिकॉशन डोस घ्यावा लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी शासकीय संस्थेतून त्वरित मोफत प्रिकॉशन डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आता शेवटची संधी दिली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. मात्र, सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे नागरिक बिनधास्त झाले आहे; परंतु कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेता प्रिकॉशन डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कोण घेऊ शकतात प्रिकॉशन डोस ?- प्रिकॉशन डोससाठी १८ वर्षांवरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिने किंवा २६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा. जिल्ह्यात प्रिकॉशन डोससाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या १३ लाख ७३ हजार १९२ आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ७९ हजार १६२ लाभार्थ्यांनी प्रिकॉशन डोस घेतला असून ही टक्केवारी १३.०५ आहे. अजुनही ११ लाख ९४ हजार  ३० नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या