शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात राजस्तरीय साहित्य संमेलन १० पासून; संमेलनाध्यक्षपदी राजन खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 15:11 IST

सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात १० ते ११ फे ब्रुवारीला दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांची बौद्धिक मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात १० ते ११ फे ब्रुवारीला दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार राजन खान तर उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.स्वागताध्यक्षपदी तनुजा बोढाले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, महापौर अंजली घोटेकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. कल्याणकर, ऐश्वर्य पाटकर, प्राचार्य डॉ.राजेश इंगोले आदी उपस्थित राहतील. उद्घाटन सत्रानंतर माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली ‘आदिवासी साहित्य : चर्चा व चिंतन’ या विषयावर दुपारी चर्चासत्र होणार आहे. यामध्ये डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. फु ला बागुल, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, प्रभू राजगडकर, विद्या खडसे, सुमेधा श्रीरामे आदी विचार मांडतील. दुपारी ३ वाजता नव्वदोत्तरी ‘ग्रामीण व जनसाहित्य’ या चर्चा सत्रात डॉ. सुभाष सावरकर, मनोहर पाऊनकर, डॉ. सतीश तराळ, डॉ. निळकंठ मेंढे, डॉ. श्याम मोहोरकर, साखली तिखे, नीता कोंतमवार सहभागी होतील. चौथ्या सत्रात किशोर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. रविवारी दुपारी १ वाजता ‘नव्वदोत्तरी आंबेडकरी साहित्य’ या चर्चासत्रात डॉ. इसादास भडके, डॉ. मंगेश गुलवाडे, विनोद दत्तात्रय, डॉ. आरती कुलकर्णी, डॉ. भास्कर पाटील, डॉ.प्रकाश राठोड, सुरेश रामटेके आदी भूमिका मांडणार आहेत. संमेलनादरम्यान कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती सूर्यांशचे इरफान शेख, माजी नगरसेवक संजय वैद्य, डॉ. विद्याधर बन्सोड, ना. गो. थुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :literatureसाहित्य