शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १०७ मुले शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST

चंद्रपूर : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबवली. यामध्ये जिल्ह्यात तब्बल १०७ मुले शाळाबाह्य ...

चंद्रपूर : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबवली. यामध्ये जिल्ह्यात तब्बल १०७ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहेत.

६ ते १४ वयोगटातील कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात १ ते १० मार्च या कालावधीत शाळाबाह्य, अनियमित आणि स्थालांतरित मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. कोरोनाच्या संसर्गातही शाळाबाह्य मुले शोधणाऱ्या पथकांनी घरोघरी, वीटभट्टी, रेल्वे फलाट, नवीन वस्त्या, रस्त्याच्या किनाऱ्यावर हंगामी मुक्कामी असलेले कुटुंब, गर्दीची ठिकाणे येथे जाऊन सर्वेक्षण केले. यावेळी काही कुटुंबाचे स्थलांतर झाल्याचे लक्षात आले. तर जिल्ह्यात तब्बल १०७ शाळाबाह्य मुले आढळून आली. यासोबतच गरजाधिष्ठित तसेच कधीही शाळेत न गेलेली मुले आढळून आली. सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहेत.

बॉक्स

चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक

जिल्ह्यात राबविलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेत सर्वाधिक मुले चंद्रपूर तालुक्यात आढळून आली. जिल्ह्यात आढळलेल्या १०७ मुलांपैकी ४२ मुले एकट्या चंद्रपूर तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ भद्रावती व नागभीड तालुक्यात १३ मुले आढळून आली आहेत. चंद्रपूर येथे रोजगारांसाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत.

बॉक्स

मुलींची संख्याही लक्षणीय

अद्यापही मुलींच्या शिक्षणाबाबत पालक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक मुलींना बालपणापासून घरगुती कामात गुंतवल्या जात आहे. त्यामुळे शाळाबाह्य मुले शोध मोहिमेत मुलींची संख्या लक्षणीय आढळून आली आहे. पालकांनी गांभीर्यांनी घेऊन मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे.

बॉक्स

बाल कल्याण विभागाचे सहकार्य

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहीम शिक्षकांसोबत बाल कल्याण विभागातील मदतनीस, पर्यवेक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात आले. या मोहिमेद्वारे ३ ते १८ वर्षे वयोगटांतील मुलांचा शोध घेण्यात आला. ३ ते ६ वयोगटांतील शाळाबाह्य मुलांची नोंद बाल कल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.

कोट