शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१०६ आदर्श ग्रामसेवक वेतनवाढीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 25, 2016 00:38 IST

ग्रामीण भागात सर्वोकृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड केली जाते

शासनाच्या आदेशाला खो : वाढीव तरतूद नसल्याची बतावणी सास्ती : ग्रामीण भागात सर्वोकृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड केली जाते. त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात यावे व त्याची नोंद गोपनिय अहवालात घेऊन सर्वोकृष्ट ठरलेल्या ग्रामसेवकास एक आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी, असा २६ आॅक्टोबर २०१० च्या शासन निर्णय असतानाही, ६ व्या वेतन आयोगात तरतूद नसल्याची बतावणी करुन जिल्ह्यातील १०६ आदर्श ग्रामसेवकांना वेतनवाढीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. १० नोव्हेंबर १९९८ च्या शासन निर्णयानुसार आदर्श ग्रामसेवक निवडीसाठी जिल्हास्तरावरील निवड समितीच्या माध्यमातून वर्षभरातील उत्कृष्ठ कामाचे शासन निकषाप्रमाणे मूल्यमापन होते. प्रत्येक पंचायत समिती मधून एक ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची आदर्श ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविल्या जात होते व त्याची नोंद त्यांच्या गोपनिय अहवालात घेऊन सोबतच एक वेतन वाढही दिली जात होती. परंतु सहाव्या वेतन आयोगात तरतूद नसल्याचे कारण पुढे करीत एक वेतनवाढ देणे बंद केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात २००६ पासून आदर्श ग्रामसेवक ठरलेल्या १०६ ग्रामसेवकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात तर आले. मात्र त्यांना एक आगाऊ वेतन वाढ देण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. वेतन वाढ दिल्या जात नसल्याने ग्रामसेवक संघटनेकडून अनेकदा निवेदने देऊन आपला हक्क मागण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. परंतु, त्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.२०१० च्या शासनिर्णयान्वये राज्यातील अहमदनगर, वर्धासह इतरही जिल्ह्यात ही वेतनवाढ दिली जात आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातच ही वेतन वाढ दिली जात नसल्याने ग्रामसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)शासन आदेश प्रत्येक जिल्ह्यात वेगळा का?आदर्श ग्रामसेवक ठरणाऱ्यांना शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात यावे व एक वेतनवाढ देण्यात यावी, असा आदेश असताना चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामसेवकांना २००६ पासून वेतनवाढ देणे बंद केले आहे. मात्र राज्यातील अहमदनगर, वर्धासह इतर जिल्हा परिषदांनी मात्र पुरस्कारासोबत एक आगाऊ वेतनवाढही दिली जात आहे. शासनाचा एकच निर्णय प्रत्येक जिल्ह्यात वेगळा का असा सवाल ग्रामसेवक संघटनांनी केला आहे.