शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

१०३ अडते-व्यापारी आजपासून संपावर

By admin | Updated: July 26, 2016 01:01 IST

शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी घेतला.

चंद्रपूर बाजार समिती : ५० लाखांची उलाढाल थांबणार, भाजीपाला महागणारचंद्रपूर : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी घेतला. या निर्णयाविरोधात राज्यात विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांचा संप सुरू आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनीही शासनाच्या निर्णयाचा विरोध दर्शवला असून मंगळवारपासून संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात भाजीपाला व फळे खरेदी-विक्री करणारे १०३ अडते व व्यापारांचा समावेश राहणार बाजार समितीची जवळपास ४० ते ५० लाखांची रोजची उलाढाल थांबण्याची चिन्ह आहेत.व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा नवीन अध्यादेश राज्य शासनाने काही दिवसांपुर्वीच काढला. या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे पत्र सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला मिळाले आहे. नवीन अध्यादेशानुसार व्यापाऱ्यांकडून अडत वसूल झाल्याने अडत्यांच्या पैशावर टॅक्सचा बोझा पडणार आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडून अडत कापली जात होती. यामुळे अडत्यांना टॅक्स भरावा लागत नव्हता. यामुळे पूर्वी लपविली जाणारी धान्याची उलाढाल आयकर विभागाच्या नजरेत येणार आहे. शासनाच्या तिजोरीतून चोरी जाणाऱ्या करालाही ब्रेक लागणार असून बाजार समितीमधील प्रत्यक्ष उलाढाल समोर येणार आहे.१३ लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाल्यास अडत्यांना सेवा कर भरावा लागणार आहे. या प्रमुख कारणाने व्यापारी आणि अडत्यांनी खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांची मात्र चांगलीच कोडी होणार असून संपामुळे भाजीपाला व फळाचे दरही वाढण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी) बैठकीतही निर्णय नाहीसंप टाळण्यासाठी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने काही दिवसांपुर्वी अडते व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे मंगळवारी होणारा संप अटळ दिसून येत आहे. चंद्रपूर बाजार समितीत दररोज ४० ते ५० लाखांच्यावर भाजीपाला व फळांची खरेदी-विक्री होते. मात्र संप झाला तरी या उलाढालीवर परिणाम होणार आहे. संपापुर्वी अडते व व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चा करणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे.