शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी अडकले साडेसात हजार कुटुंब

By admin | Updated: November 18, 2014 22:52 IST

मागील काही वर्षात जिल्ह्यात ७ हजार ५०० कुटुंबाच्या विरोधात महिलांनी हुंड्यासाठी छळ करीत असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यातील काही प्रकरण न्यायालयात आहे. मात्र या

चंद्रपूर : मागील काही वर्षात जिल्ह्यात ७ हजार ५०० कुटुंबाच्या विरोधात महिलांनी हुंड्यासाठी छळ करीत असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यातील काही प्रकरण न्यायालयात आहे. मात्र या प्रकरणात महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण किती खरे आणि किती खोटे याचा शोध घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, महिला तक्रार निवारण केंद्र तसेच भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूरतर्फे काही कुटुंबाना जोडण्याचे काम सुरु आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. हे सत्य असले तरी काही महिलांकडून जाणूनबुजन पुरुषांना त्रास देण्याचा प्रकारही मागील काही वर्षांमध्ये समोर येत आहे. विविध कारण शोधून पुरुषांना फसविण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. सध्या ४९८(अ) या कलमाला गैरवापर होत असून पुरुष या कायद्याने भयभीत होत असल्याचे मत भारतीय परिवार बचाव संघटनेने व्यक्त केले आहे. कुटुंबात काही वाद झाल्यास महिला पोलीस स्टेशनचा रस्ता पकडतात. काही वेळा माहेरील लोकांकडूनही दबाव आण्यात येत आहे. या प्रकारामुळे कुटुंब जोडण्याऐवजी तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय परिवार बचाव संघटनेच्या चंद्रपूर शाखेने मागील एक वर्षामध्ये तब्बल ५५ कुटुंबीयांना जोडण्याचे काम केले आहे. या व्यतिरिक्त पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या महिला तक्रार निवारण केंद्रातूनही कुटुंब जोडण्याचे काम सुरु आहे. मात्र पाहिजे तसे यश अद्यापही आले नाही. त्यामुळे एकदा पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर त्या कुटुंबाची वाताहत होते. महिलांनी अन्याय होत असल्यास नक्कीच ४९८ (अ) कलमाचा वापर करावा. मात्र विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने एखाद्या कुटुंबाला फसविण्याचा पाप करू नये, असे मत भारतीय परिवार बचाव संघनेच्या चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी व्यक्त केले आहे. (नगर प्रतिनिधी)