शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याने घेतला १० वर्षाच्या मुलाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:19 IST

Leopard Attack, Chandrapur News ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी जवळील वांद्रा येथील एका दहा वर्षाच्या मुलाचा गुरुवारी बिबट्याने बळी घेतला. ही घटना गुरुवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत क्षेत्र सहाय्यक कार्यालय मेंडकीमधील चिचगाव बिटात घडली.

ठळक मुद्देब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी जवळील वांद्रा येथील एका दहा वर्षाच्या मुलाचा गुरुवारी बिबट्याने बळी घेतला. ही घटना गुरुवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत क्षेत्र सहाय्यक कार्यालय मेंडकीमधील चिचगाव बिटात घडली. नैतिक संतोष कुथे असे मृतक मुलाचे नाव आहे.नैतिक हा नेहमीप्रमाणे चिचगाव परिसरात पहाटे व्यायाम करण्यासाठी जात होता. दरम्यान, त्याच बिटात दबा धरून बसलेल्या बिबट्याने नैतिकवर हल्ला चढविला. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ब्राम्हे या आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचल्या. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या भागातील वाघांचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी चिचगाव, वांद्रा येथील नागरिकांनी केली आहे.विशेष म्हणजे, यापूर्वीदेखील या भागात लहान मुलांवर वाघाचे कित्येकदा हल्ले झाले आहेत. यात काहींचा बळी तर काही मुले जखमी देखील झाले आहेत. या भागात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडपी जंगल असल्यामुळे येथे बिबट, वाघ या हिंस्र प्राण्यांचा वावर आहे.

टॅग्स :leopardबिबट्या