शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

१० लाखांचे रोपवन गायब

By admin | Updated: May 12, 2017 02:20 IST

निसर्गाचा समतोल अबाधित राहावा, यासाठी वृक्षलागवड करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी

कुंपणानेच शेत खाल्ले : गोंडी विहिरगाव येथील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क मूल : निसर्गाचा समतोल अबाधित राहावा, यासाठी वृक्षलागवड करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम अंमलात आणला. मात्र वन विभागातील कर्मचारी व अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वृक्षलागवडीचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यास बाधा निर्माण होत असल्याचा प्रकार चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मौजा गोंडी विहिरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मध्ये बघितल्यानंतर दिसून येते. रोपवनावर १० लाख रुपये खर्च करण्यात आल्यानंतरही त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष झाल्याने रोपे करपली. आजच्या स्थितीत सदर जागेवर एकही रोप नसून झाडे झुडपे वाढली असल्याचे दिसून येते. यावरुन कुंपनानेच शेत खाल्ले की काय, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. शासन स्तरावर रोपवन लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन त्यांचे संगोपन करण्यासाठी वनविभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. मात्र चंद्रपूर वनविभागाअंतर्गत चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मौजा गोंडी विहिरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मध्ये जुलै २०१० मध्ये ५० हेक्टर जमिनीवर मिश्र रोपे लावण्यात आली. संयुक्त वनव्यवस्थापन समिती ताडाळाच्या वतीने करण्यात आलेल्या या रोपवनासाठी पाच वर्षांपर्यंत १० लाख रुपये खर्च करण्यात आले. सतत पाच वर्षे रोपावर खर्च निधी दाखविण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात त्या जमिनीवर एकही रोपण केलेला वृक्ष आढळत नसल्याने सतत पाच वर्षे कुठल्या रोपावर निधी खर्च केला, हा प्रश्नच आहे. या रोपवनासाठी रोप आणणे, खड्डे खोदणे, कुंपन करणे आदींवर लाखो रुपये करण्यात आले. संयुक्त वनव्यवस्थापन समिती ताडाळाच्या वतीने सदर जागेवर मिश्र रोपे लावण्यासाठी वनविकास यंत्रणा चंद्रपूरच्या वतीने ३१ मार्च २०१० ला समितीला दोन ६१ हजार २५० रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. त्यानंतर २ जुलै २०११ ला ३ लाख ६१ हजार रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. २१ मार्च २०१४ पर्यंत १० लाख २६ हजार १२४ रुपये प्राप्त झाले. सतत पाच वर्षे रोपावर निधी खर्च दाखविण्यात आला. रोपे वाढविण्यासाठी प्रयत्नच झाला नसल्याचे दिसून येते. आजच्या स्थितीत मूल तालुक्यातील गोंडी विहीरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मधील ५० हेक्टर संरक्षित वनामध्ये एकही रोप आढळून येत नाही. आजच्या स्थितीत एकही रोप दिसत नसल्याने कुंपनानेच शेत खाल्ले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रातील या गोंडी विहीरगाव येथे असा प्रकार होत असेल तर इतरही ठिकाणी काय स्थिती असावी, याचा विचार न केलेलाच बरा.