शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंसाठी शहरात १० आरोग्य शिबिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:46 IST

महानगरपालिका आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारपासून शहराच्या विविध वॉर्डांमध्ये मोफत बाह्यसंपर्क आरोग्य व असंसर्गजन्य रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्र. ५ तुकूम महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

ठळक मुद्देमनपाचा विशेष उपक्रम : विविध वॉर्डांमध्ये होणार हजारो रूग्णांवर मोफत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारपासून शहराच्या विविध वॉर्डांमध्ये मोफत बाह्यसंपर्क आरोग्य व असंसर्गजन्य रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्र. ५ तुकूम महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.आरोग्य शिबिर १५ ते २५ जानेवारी दरम्यान तुकूम, बालाजी वॉर्ड, वडगाव, एकोरी वॉर्ड, आनंदनगर, अंचलेश्वर वॉर्ड, बाबुपेठ, बंगाली कॅम्प, पठाणपुरा, लालपेठ, कृष्णानगर, नगिनाबाग वॉर्डात होणार आहेत.यावेळी आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे उपस्थित होते. महापौर अंजली महापौर म्हणाल्या, आधुनिक काळातील जीवन अतिशय धकाधकीचे आहे, प्रत्येक व्यक्ती काहीनाकाही दडपणाखाली असतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. तणावामुळे कमी वयात हृदयरोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. उपचारासाठी ताटकळत राहावे लागू नये, यासाठी ‘दवाखाना आपल्या दारी’ आणण्याची मोहीम सुरू केली. मधुमेह, खोकला, सर्दी, रक्तदाब या आजारांवर संबंधित वॉर्डात मोफत तपासणी केल्या जात आहे, असेही महापौर घोटेकर यांनी सांगितले.डॉ. आंबटकर म्हणाल्या, पल्स पोलिओ, हत्तीरोग दुरीकरण, जीवनसत्व अ, जंतनाशक मोहीम, गोवर रुबेला मोहीम अशा विविध आरोग्यविषयक मोहीमा नागरिकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. डॉ. मोरे यांच्या सहकार्याने प्रत्येक शिबिरात स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशिअन, दंत चिकित्सक डॉक्टरांची सेवा उपलब्ध असणार आहे. २७ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला मोहिमेत ज्यांनी अद्याप एमआर लसीकरण केले नाही, अशा बालकाला शिबिरात मोफत लसीकरण केल्या जाणार आहे.संवादामुळे वाढली जागृतीगोवर-रुबेला आजार हद्दपार करण्याची मोहीम शासनाद्वारे सुरु आहे. मनपा आरोग्य विभागाने अंमलबजावणी करत आहे. काही व्यक्ती, शाळांनी लसीकरणाला विरोध केला. परंतु आयुक्त काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आंबटकर यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाने नागरिकांशी संवाद साधून लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करत आहे. मनपा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण अजूनही सुरू आहे.