शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१० खासगी रुग्णालयात मोफत लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:09 IST

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देेशानुसार शहरात गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. २०२० पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला नियंत्रण करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. गुरूवारी शहरातील १० खासगी दवाखान्यांमधे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत गोवर रूबेला लसीकरण देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमनपाची माहिती : बालकांना न चुकता गोवर आणि रूबेला लसीकरण द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देेशानुसार शहरात गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. २०२० पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला नियंत्रण करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. गुरूवारी शहरातील १० खासगी दवाखान्यांमधे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत गोवर रूबेला लसीकरण देण्यात येणार आहे.महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरात गोवर रूबेला लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्या जात आहे. शहरात सर्व शाळा, अंगणवाडी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून आतापर्यंत ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ८१ हजार ७५६ बालकांना लस देण्यात आली आहे. ुयोग्य नियोजनाद्वारे मोहीम सुरळीतपणे पार पडण्याकरिता आरोग्य विभाग प्रयत्नरत आहे. खासगी रूग्णालयामध्ये एक दिवस मोफत लसीकरण केल्या जाणार आहे. यापूर्वी ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही अशा पाल्यांच्या पालकांनी या अभियानाचा लाभ घेतला पाहिजे. आपला पाल्य निरोगी राहावा, याकरिता गोवर रूबेला लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली. आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. राजुरवार, डॉ. आकुलवार, डॉ. गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत व आरोग्य विभाग कर्मचारी नियोजनबद्ध व समर्पण भावनेने अभियान राबविण्यास सज्ज झाले आहेत. गोवर रूबेला लसीकरण मोहिमेत चंद्र्रपूर महानगरपालिका महाराष्ट्रात अग्रस्थानी राहावा, याकरिता आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली. बालकांमध्ये लहान वयातच प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी शहरातील सर्व शासकीय, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत दिली जात आहे.लसीकरण उपलब्ध असणारी रूग्णालयेजलनगर येथील शिवजी हॉस्पिटल, डॉ. एम.जे. खान जटपुरा गेट शिशु हॉस्पिटल, डॉ. गोपाळ मुंदडा जटपुरा गेट येथील मुंदडा क्लिनिक, डॉ. ज्योत्स्ना उमरेडकर जयंत टॉकीज परिसर अमृता क्लिनिक, डॉ रफिक मावानी जटपुरा गेट मी अ‍ॅन्ड मम्मी हॉस्पिटल, डॉ. अमित डांगेवार बालाजी वॉर्ड, चैतन्य क्लिनिक, डॉ. अभिलाषा गावतुरे हॉस्पिटल वॉर्ड किलबिल हॉस्पिटल, डॉ. पालीवाल महाकाली वॉर्ड पालीवाल हॉस्पिटल, डॉ. प्रमोद भोयर, तुकूम येथील बाल रुग्णालय, डॉ. अभिजीत संखारी बंगाली कॅम्प येथील विवेक क्लीनिक आदी १० खासगी रूग्णालयात बालकांना मोफत लसीकरणाची सुविधा आहे.