शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात १० घरफोड्या

By admin | Updated: April 20, 2016 01:13 IST

शहरातील जगन्नाथबाबानगर परिसरात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ...

नागरिकांत दहशत : दोन मोटारसायकल, कॅमेरा लंपासचंद्रपूर : शहरातील जगन्नाथबाबानगर परिसरात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरातील तब्बल घरे चोरट्यांनी फोडली. एकाच रात्री १० घरफोड्या होण्याची ही गत काही वर्षांतील पहिलीच घटना असून या घटनेमुळे सामान्य नागरिकांसह पोलीस यंत्रणाही हादरून गेली आहे. चोरट्यांनी १० ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र केवळ दोन ठिकाणावरून त्यांनी दोन मोटारसायकल व कॅमेरा लंपास केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर निरव शांततेत चोरट्यांनी आपले चौर्यकर्म आटोपले. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. चोरट्यांनी जगन्नाथबाबानगर परिसरातील साई प्लाझामध्ये किरायाने वास्तव्याला असलेले गोपाल देवराव मेश्राम यांची ३५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल व पाच हजार रुपये किंमतीचा कॅमेरा लंपास केला. तसेच त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या भारत चवाटे यांची मोटारसायकल लंपास केली. यासोबतच याच परिसरातील सुधारकर पाटील, एन.घोगे, जगदीश कथले, बंडू नागपुरे, विजय खेडकर, गणपत आगलावे, यांच्या निवासस्थानासह अंबिका बहुद्देशिय शिक्षण संस्थेचे कार्यालय तसेच सद्गुरू मेडीकलचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणावरून कोणताही मुद्देमाल चोरट्यांच्या हाती लागला नाही. मंगळवारी घटना उघडकीस आल्यानंतर गोपाल मेश्राम यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५७, ३८०, ५११, ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)घुग्घुस मध्ये ६४ हजारांच्या दागिन्यांची चोरीघुग्घुस : येथील कॉलरी गाधीनगरमधील कामगार वसाहतीत अज्ञात चोरट्यांनी क्वॉर्टरचे कुलूप तोडून ६४ हजारांचे सोनेचांदीचे दागीने लंपास केले. सदर घटना सोमवारी उघडकीस आली. वेकोलिच्या गांधीनगर कामगार वसाहतीत वास्तव्यास असलेले रामया कलवल हे १५ ते १७ एप्रिल दरम्यान क्वॉर्टरला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. काल परत आल्यानंतर क्वॉर्टरचे कुलूप तोडून असल्याचे दिसून आले. घरात पाहणी केली असता, क्वॉर्टरमधील रोख दोन हजार व ६४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 66 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले. मंगळवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळावर श्वानपथकाला पाचारण केले. मात्र कोणतेही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले नाहीत. ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक चिडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने विलास निकोडे तपास करीत आहे. (वार्ताहर)