शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

Excuse: कारणं सांगत पळवाटा शोधताय? मग तुमचं करिअर ढपणारच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:46 IST

जे जमलं ते केलं, जे नाही जमलं ते नाही जमलं. केलं ते केलं, जे नाही केलं ते नाहीच करणार जा, असं स्वत:ला आणि इतरांना सांगण्याची धमक आहे का आपल्यात?

ठळक मुद्देसतत कारणं सांगत राहिलं की, कामं पुढं ढकलण्याची सवय लागते.आपण आळशी बनतो, खोटं बोलतो.आपली कार्यक्षमता तर वाया जातेच, विश्वासार्हताही कमी होते.

-चिन्मय लेले

थ्री इडियटमधल्या व्हायरसचं ते वाक्य ऐकलंय ना? काय चुकीचं म्हणतात ते महाशय विरू सहस्त्रबुद्धे? ते म्हणतात ते खरंच तर आहे. ते विचारतात, वडील आजारी होते म्हणून खाना-पिना-नहाना-सांस लेना या गोष्टी सोडल्या का? नाही ना,  मग ’’मी डिस्टर्ब होतो’’ म्हणून अभ्यास करणं, प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करणं, आणि करता येणं शक्य असलेल्या अनेक गोष्टी स्वतर्‍चे लाड करत न करणं, जे केलं नाही, टाळलंच त्यासाठी कारणं सांगत राहतो, हे का करतो आपण?  जी माणसं सतत कारणं सांगतात, ती कधीही यशस्वी होत नाही, हा जगाचा नियम आहे.

व्हायरसच्या त्या वाक्याचं वाईट वाटतं, म्हणजे अगदी कोरडेठाक दगड होऊन फिलिंग्ज डिलीटच मारून टाकायच्या का असा प्रश्न पडलाच असेल कुणाला? तर विचार करा, खरंच कारणं नाही देत आपण चालढकल करतो त्या कामांसाठी?

 यार, कबूल करून टाकू ना, की फार कारणं सांगतो आपण. भयंकर एक्सक्यूज देतो. हे झालं म्हणून तसं झालं, ढिमकं झालं म्हणून मी टिमकं केलं.

ट्राफिक जाम होतं म्हणून आज मला लेट झाला.

घडय़ाळाचा गजरच झाला नाही म्हणून उशीरा उठलो.

मी नसतेच चिडत कधी, पण माणसं डोक्यात जातात म्हणून मी वसवसते.

मी शांतच असतो, पण लोकंच अशी वागतात की राग येतोच, मग बोलतो मी काहीतरी, लोकांना आधी धड बोलायला शिकवायला पाहिजे.

-कित्त्ती कारणं.!

जमेल तेव्हा, जमेल तशी कारणं देत आपली मान सोडवून घेण्याची कसरत करायला एकदम सरावलेलो असतो आपण.

नुस्ती कारणं सांगतो आणि जे जमलं नाही त्याचं खापर त्या कारणांच्या डोक्यावर फोडून मोकळे होतो.

‘कारणे सांगा’ विषयात मग आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडायला लागतात. आणि जे करणं शक्य असतं ते करणं आपण ‘कारणा’त घुसडून कधीच करत नाही.

म्हणजे बघा मॅच हरली म्हणून आपण विराट कोहली देतो ती कारणं खरी मानतो का? ते जाऊ द्या, आईबाबा आपल्याला एखादी गोष्ट नाकारतात तेव्हा त्यांची कारणं खरी असली तरी आपल्याला पटतात का?

मग आपणच कोण असे तिसमारखां लागून गेलोय की, आपण सतत एक्सक्यूज देतो?

ही सतत एक्सक्यूज देण्याची सवयच समजा सोडून दिली तर.?

जे जमलं ते केलं, जे नाही जमलं ते नाही जमलं.

जे केलं ते केलं, जे नाही केलं  ते नाहीच करणार जा.

असा उद्धट अ‍ॅटिटय़ूड एकवेळ परवडला पण ही कारणांची लडच फूस्स करून टाकायला हवी.

आणि एखाद्या दिवशी झालाच उशीर तर सांगू ना बिन्धास की झोपून राहिलो गाढवासारखा.झाला उशीर!

नाहीच झालं काम तर सांगू स्वतर्‍लाही की आपण आळशी आहोत, हे असेच वागलो,  तर एकदिवस फुकट मरू.

किती सोप्पं.

आपली जबाबदारी आपण घेऊन मोकळं व्हायचं. काही कारणं सांगायची नाहीत, काही झंझट नाही, काही खुलासे नाहीत.

बंद सगळं. नो एक्सक्यूजेस! ही एक सवय आपल्याला यशाच्या दिशेनं किमान काही पाऊलं तरी पुढं नेऊ शकते