शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

सेल्फ ब्रॅण्डिंग करा, पण शो-ऑफ कराल तर करिअर गोत्यात येईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 17:03 IST

सोशल मीडीया आपण सेल्फ ब्रॅण्डिगसाठी उत्तम वापरू शकतो, फक्त जरा डोकं ताळ्यावर ठेवा.

ठळक मुद्देस्वतःविषयी बोलणं आणि चमकोगिरी करणं यात फरक आहे हे विसरलं तर ब्रॅण्डिग फसलंच.

-नितांत महाजन

सोशल मीडीया आपण आपल्या स्वतर्‍च्या ब्रॅण्डिगसाठी उत्तम वापरू शकतो. तसं ब्रॅण्डिंग करण्यात काही गैर नाही. आपण चांगलं काम करतो तर ते काम लोकांर्पयत, आपल्या क्षेत्रातील माणसांर्पयत पोहचणं, आपली एक उत्तम ओळख अर्थात इमेज बनवणं यात काही गैर नाही. इमेज मेकिंगसाठी आपण काही हजारो रुपये खचरुन पीआर नाही करू शकत. पण या काळात उत्तम करिअर करायचं असेल तर आपण, आपलं काम, हेच आपला ब्रॅण्ड बनलं पाहिजे. मात्र हे करण्याच्या नादात आपण आपली बदनामी करत नाही, आपली ब्रॅण्डव्हॅल्यू गमवत तर नाही ना याकडे लक्ष दिलेलं बरं. नाही तर हे ब्रॅण्डिगचं अस्त्र आपल्यावरच उलटायला वेळ लागत नाही.तर उत्तम सेल्फ ब्रॅण्डिग साठी या काही गोष्टी लक्षात ठेवा.

1) सोशल मीडीया फ्रेण्डससोशल मीडीयात आपले फार फॉलोअर्स आहेत हे दाखवण्यासाठी आपण आली ती प्रत्येक फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारतो. मात्र असे फ्रेण्ड जर आपल्या वॉलवर, पोस्टवर वाट्टेल ते बडबडत असतील किंवा स्वतर्‍च काहीबाही खरडत असतील तर ते आपली इमेज बिघडवतात. त्यामुळे मित्र इथंही पारखूनच घ्या.

2) सोशल मिडीयात मत मांडाल. एखादी कमेण्ट कराल तर ते अभ्यास करुन लिहा. पाचकळ पणा, लूज टॉक करू नका.3) तुम्ही जे लिहाल ते सम्यक, योग्य, अभ्यासपूर्ण असेल त्याला काही किंमत असेल असं इतरांना वाटलं पाहिजे.4) आपले पर्सनल फोटो, पर्सनल पाटर्य़ातले फोटो, पर्सनल नातेसंबंध याचं प्रदर्शन शक्यतो करू नये.

5) आपलं काम शेअर करा, पण ते नम्रपणे. तिथं शो ऑफ करू नका. मीच किती भारी, अंतिम सत्य मीच सांगितलं असं चित्र निर्माण करू नये.6) वाद झाला तरी ते तात्पुरते ठेवावे कुणाची व्यक्तिगत बदनामी करू नये.7) आपल्या क्षेत्राविषयी, कंपनीविषयी बदनामीकारक गोष्टी लिहू नये.8) काही अन्याय असेल तर ते लिहिताना अभ्यास करुन, पुरावे मांडून लिहावे.9) इतरांवर शेरेबाजी करू नये. कुणाचा अपमान करू नये.10) आपण अतीच बोलतो, वाचाळ आहोत अशी आपली इमेज होऊ नये.