शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

आॅफिसमध्ये बिनधास खेळा व्हीडीओ गेम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 18:44 IST

तुमचा कामाचा ताण कुठल्या कुठे पळून जाईल, पण त्याआधी आपल्या बॉसला मात्र ते पटवून द्या..

ठळक मुद्देआॅफिसच्या कामात दर थोड्या वेळानं ब्रेक घ्या.या ब्रेकमध्ये तुम्ही व्हीडीओ गेम खेळलात तर व्हाल फ्रेश.तुमची कार्यक्षमताही वाढेल.नवीन आव्हानं घेण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल.

- मयूर पठाडेसध्या आॅफिसमध्ये कामाचं इतकं टेन्शन आहे ना, की विचारायला सोय नाही. म्हणजे ‘कामाचं’ टेन्शन नाही, पण माणसं नाहीत, आहे त्या कर्मचाºयांवर रेटून न्यायचं, मालक नवीन कर्मचारी भरतही नाही आणि आपल्यावरचा कामाचा लोड कमीही होत नाही.. शिवाय डेडलाईन सतत डोक्यावर...कामाचं टेन्शन बहुदा नसतंच. ते तर करावंच लागतं. पण चार माणसांची कामं एकट्यानं आणि तीही दिलेल्या डेडलाइनमध्ये पूर्ण करायची म्हटलं की टेन्शन येणारच. एकट्या माणसानं पळून पळून पळायचं तरी किती?खरंच सांगतो, आॅफिसात आल्यावर एकदा का कामाला जुंपलं की साधं शरीरधर्मासाठी जागेवरुन उठायलाही वेळ होत नाही.. पार पिट्ट्या पडलाय..सध्या सगळ्यांचंच असंच होतंय. कोणीही त्याला अपवाद नाही. थोडाफार फरक इतकंच.अभ्यासक म्हणतात, दर थोड्या वेळानं, तासाला ब्रेक घ्या.. कसा घ्यायचा हा ब्रेक?.. पाच मिनिट गेले तर वाटायला लागतं, फार वेळ गेला. कसं आटपायचं आता हे काम?..पण तुम्हाला माहीत आहे, ब्रेक घ्यायलाच हवा. तोही दर तासा, दिड तासाला. फक्त पाच मिनिटांचा घ्या, पण आपल्या कामात ब्रेक आवश्यक आहे. विशेषत: कामाचा डोंगर तुम्ही उपसत असाल, तर मग या ब्रेकची जास्तच आवश्यकता आहे.

ब्रेकमध्ये काय कराल? शास्त्रज्ञांनी कोणता प्रयोग केला?१- संशोधकांनी नुकतंच एक महत्त्वाचं संशोधन केलं. त्यांचं म्हणणं आहे, ब्रेक तर घ्याच, पण या ब्रेकमध्ये तुम्ही मोबाइलवर चक्क व्हीडीओ गेम खेळा!२- आता तुम्हाला कोण आॅफिसमध्ये व्हीडीओ गेम खेळू देणार? पण हा गेम खेळायचा आहे फक्त पाच मिनिट. तुम्हाला रिफ्रेश करण्यासाठी.३- शास्त्रज्ञांनी त्यासाठी एक प्रयोगच केला. एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि हेल्थकेअरच्या संदर्भातील एका संस्थेच्या कर्मचाºयांवर त्यांनी हा प्रयोग केला. त्याचे निष्कर्ष आश्चर्यजनक होते.४- या कर्मचाºयांचे त्यांनी दोन गट केले. एका गटाला ब्रेकमध्ये व्हीडीओ गेम खेळायला दिला आणि दुसºया गटानं पाच मिनिट फक्त आराम केला.५- या दोन्ही गटातील लोकांची स्ट्रेट लेवल, कॉग्निटिव्ह परफॉर्मन्स, मूड याचाही त्यांनी विचार केला.६- ज्या गटानं फक्त आराम केला होता, त्यांच्यातील स्ट्रेस लेवल फारसं कमी झाल्याचं त्यांना आढळून आलं नाही.७- ज्या गटातल्या कर्मचाºयांनी ब्रेकमध्ये व्हीडीओ गेम खेळला, त्यांच्यातील तणाव मात्र खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं त्यांना आढळून आलं.८- त्यामुळे बाकी असलेल्या कामातील त्यांची गती आणि त्यातली अचुकताही त्यामुळे वाढली.९- हा प्रयोग ‘ह्यूमन फॅक्टर्स’ या नावाजलेल्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला असून आॅफिसवेळेत तुमचा ट्रेस घालवण्यासाठी तुम्ही व्हीडीओ गेम खेळला तर तुमचं टेन्शन, स्ट्रेस कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे.१०- तुमचंही डोकं कामानं भणभणलं आणि तणतणलं असेल, तर आॅफिसच्या कामातून ब्रेक घेऊन पाच मिनिट व्हीडीओ गेम खेळा, आपल्या कामातून पूर्णपणे बाहेर या आणि नंतर नव्या जोमानं पुन्हा कामाला लागा.११- पण तत्पूर्वी शास्त्रज्ञांचं हे म्हणणं आपल्या मालकाला, बॉसला अवश्य पटवून सांगा. नाहीतर..