शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्न, ध्येय महत्त्वाचंच, पण तुमच्या स्वप्नांची वाट त्याहूनही अधिक महत्त्वाची..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 15:19 IST

स्वप्नापर्यंत पोहोचण्याची योग्य वाट आधी शोधा आणि मग त्या दिशेनं चालत राहा.. स्वप्न तुमच्या हातात असेल..

ठळक मुद्देस्वप्न महत्त्वाचंच, पण त्या दिशेकडे नेणारी वाट अधिक महत्त्वाची.आपल्याला कुठे जायचं आहे, हे तर आपल्याला माहीत असतं, पण कसं जायचं, कुठल्या मार्गानं जायचं हेच आपल्याला महीत नसतं.रस्त्याच्या शोधातच मग आपली निम्मी किंवा त्यापेक्षाही अधिक शक्ती खर्च होते आणि पुढच्या वाटा बंद होतात.

- मयूर पठाडेप्रत्येकाचं एक ध्येय असतं. आयुष्यात आपल्याला काय करायचंय, कुठे जायचंय, याचं स्वप्नं प्रत्येकानं पाहिलेलं असतं. अगदी प्रत्येकानंच असं ध्येय ठरवलेलं असेल असं नाही, पण अनेकांना आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे हे मनोमन पक्कं ठाऊक असतं. या स्वप्नाच्या दिशेनं त्यांचा प्रवासही सुरू असतो.आपल्या स्वप्नाच्या दिशेनं अनेक जण पावलं टाकतात, काही अंतर चालूनही जातात, अनेक जण बरीच प्रगतीही करतात, पण किती जण आपल्या धयेयापर्यंत पोहोचतात? किती जणांचं स्वप्न पूर्ण होतं?निरीक्षण केलं तर लक्षात येईल, अनेकांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलेलं असतं. ते पूर्ण होतच नाही. अर्ध्यातच त्यांना आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा सोडून द्यावा लागतो. आणि मग पुढे आयुष्यभर ते त्यासाठी कुढत राहातात. आपलं स्वप्न निदान दुसºयानं, निदान आपल्या मुलांनी तरी पूर्ण करावं यासाठी त्यांचा झगडा मग सुरू होतो..पण मुलांना आपल्या आईबापाच्या स्वप्नात रस असेलच असं नाही. त्यांना त्यात रस असेल तर ठीक, पण तेही या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतील की नाही, याची काहीच गॅरन्टी नसते.का होतं असं?..कारण आपल्याला कुठे जायचं आहे, हे तर आपल्याला माहीत असतं, पण कसं जायचं, कुठल्या मार्गानं जायचं हेच आपल्याला महीत नसतं. रस्त्याच्या शोधातच मग आपली निम्मी किंवा त्यापेक्षाही अधिक शक्ती खर्च होते. काही वेळा या ध्येयापर्यंत जाण्याची योग्य वाट शोधण्यातच इतका वेळ जातो की नंतर खरोखरच वेळ निघून गेलेली असते.त्यामुळे आपलं स्वप्न काय, ध्येय काय हे कितीही महत्त्वाचं असलं तरी या ध्येयापर्यंत कसं जायचं, हे त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं. आपला रस्ता, आपली वाट आधी शोधा.. आणि मग बघा.. रिझल्ट नेहमीच वेगळा आणि सकारत्मक दिसेल..