शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

धोनीइतकी चांगली आहे का तुमची निर्णयक्षमता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 11:50 IST

उत्तम करिअर करायचं तर योग्यवेळी योग्य निर्णय घेता यायला हवेत!

ठळक मुद्देरिस्क घ्या, पण अभ्यास करुन!प्लॅन ए हवाच, पण प्लॅन बी असणं म्हणजे कमीपणा नव्हे.इमोशनल आहोत म्हणत भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका.

- समिंदरा हर्डीकर-सावंत

 

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण लहान मोठे निर्णय घेतच असतो. अनेकदा तर  आपल्या लक्षातही येत नाही की आपण निर्णय घेतलाय, त्याप्रमाणं कृतीही करतोय. तसं पाहता निर्णय घेणं, निवड करणं ही कला प्रत्येक व्यक्तीला सहज येत असते.

अगदी व्यक्तिगत आयुष्यातसुद्धा आपण कधीतरी चिडून म्हणतो की, तुमचं तुम्ही ठरवा मी काहीही सांगणार नाही, निर्णय देणार नाही. हे म्हणणंसुद्धा एकप्रकारचा निर्णयच असतो.

व्यक्तिगत संदर्भात हे सारं सहज होतं, नकळत घडतं. कधी आपण जोखमीचे निर्णय जवळच्या माणसांना विचारूनही घेतो.

पण नोकरीत, कामाच्या ठिकाणी मात्र निर्णय घेणं हीसुद्धा एक कलाच आहे. एक महत्त्वाचं स्किल आहे. आता या स्किलला एक वेगळंच महत्त्व येतं आहे.

कारण नोकरीत काम करताना तुम्ही जेव्हा काही निर्णय घेता तेव्हा ते निर्णय फक्त स्वतर्‍पुरते मर्यादित नसतात. माझं मी पाहून घेईन असं म्हणून चालत नाही.  तुम्ही घेत असलेल्या निर्णयांचा प्रभाव इतरांवरही पडत असतो. परिणाम इतरांशीही संबंधित असतात. आणि म्हणूनच तुम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेता की नाही, ते निर्णय घेण्याइतपत धाडस दाखवता की नाही हे वारंवार तपासलं जातं!

धोनी मॅचमध्ये योग्यवेळी योग्य निर्णय घेतो ही त्याची खासियत आहे, तेच त्याचं स्किलही आहे.

ते स्किल आपल्याकडेही यावं आणि आपण आपल्या टीमचं धोनी व्हावं म्हणून काही प्रयत्न करता येतील. शिकताही येईल हे स्किल.

त्यासाठी या काही साध्या सोप्या गोष्टी.

टेक इट ऑर लिव्ह इट!

1) निर्णय घ्यायला बिचकू नका. सारासार दृष्टिकोन ठेवा. व्यवहार ज्ञान वापरा. परिस्थितीचा पूर्ण आढावा घ्या. आणि मग योग्य वाटेल ते निर्णय घ्या. आपलं चुकेल हे डोक्यातून काढून टाका.

2) मला वाटलं म्हणून मी असं केलं, अशा म्हणण्याला व्यावसायिक जगात काही स्थान नसतं. निर्णय घेण्यासाठी लागणारी सर्व माहिती एकत्र करा. योग्य माहिती निवडली, तिचा अचूक विचार केला तर अचूक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वाढते.

3) निर्णय कुठलाही घ्या, तो शंभर टक्के बरोबरच ठरेल असं काही. अनिश्चितता हा कुठल्याही निर्णयाचा अपरिहार्य भाग असतोच. धोका असतो, असुरक्षितता आणि जोखीमही असते.  तिथंच तर खरं कसब लागतं. त्यामुळे जोखीम पत्करायची तयार असणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा.

4) आपण म्हणतो पुरेशी माहिती जमवा पण अनेकदा निर्णय घेताना आपल्याकडे पुरेशी माहितीही नसते. अशावेळी शितावरून भाताची परीक्षा करत निर्णय घ्यावा लागतो.

5) कितीही महत्त्वाकांक्षी निर्णय तुम्ही घेतला तरी वास्तवाशी त्याचं नात असणं महत्त्वाचं. ‘हवा में तीर’ असं करून चालत नाही. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊच नयेत; पण ते घेतानाही आपण पुरेसा प्रॅक्टिकल विचार केलेला असणं महत्त्वाचं! 

6) आपण हल्ली प्रत्येक गोष्टीत ऑप्शन काय याचा विचार करतो. तशा ऑप्शनचा विचार करा, नसतील तर निर्माण करा. मग प्रत्येक पर्याय पडताळून जो सर्वात उत्तम असेल, त्याची निवड करा.

7) कोणताही निर्णय पूर्णपणे भावनांच्या आहारी जाऊन घेऊ नका. निर्णय घेण्यामध्ये भावनांचा विचार करावा, परंतु भावना आणि वस्तुस्थिती यांचा तारतम्यानं विचार करणं गरजेचं!  इमोशनली आणि घाईघाईत घेतलेले निर्णय हमखास गोत्यात आणू शकतात.

8) मुख्य म्हणजे आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करा. आपल्या निर्णयानं ऑफिसात कोणावर, कसा परिणाम होईल, काय रिअ‍ॅक्शन येतील याचा आधीच विचार करून ठेवा. त्यामुळे काही गडबड झाली तरी पुढं काय करायचं याचा निर्णयही आपण घेतलेलाच असतो.

9) नव्या जगाता डिसिजन मेकिंग हे सगळ्यात महत्त्वाचं स्किल ठरतं आहे हे विसरू नका.

10) चटचट निर्णय घेऊन पटपट कामाला लागणार्‍या आणि इतरांना कामाला लावणार्‍या माणसांची खरंतर आता चलती आहे.

त्यात तुम्ही आहात का?