शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सतत चिडचिडता, धोनीला विचारा आईसकुल कसं रहायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:15 IST

मैदानात डुलकी काढणार्‍या धोनीवर परफॉर्मन्सचं प्रेशर नाही, आणि आपल्यावर आहे असं थोडंच आहे?

ठळक मुद्देधोनीकडून दोन गोष्ट शिकल्या तरी आपलं करिअर एक्सप्रेसवेचा स्पीड घेईल!

-चिन्मय लेले

धोनीचा फोटो पाहिलात? मैदानात झोपलेला. ट्विटरवर अनेकांनी त्याचं कौतूक केलं. त्याच्या आईसकुल स्वभावाची पुन्हा चर्चा झाली. लोकांनी वारंवार सांगितलं की, असं थंड डोक्यानं काम करतो तोच जिंकतो. उगाच का धोनी काल 300 वा वन डे सामना खेळला. त्याच्यासारखा चॅम्पिअन खेळाडू तोच. पण हे सारं कितीही खरं असलं तरी लोक मैदानात बाटल्या फेकत असताना, पब्लिक रागानं पागल होत असताना एक डुलकी काढून घेऊ म्हणत मैदानात आराम करणं हे काय सोपं काम आहे का? इतक्या प्रेशरमध्ये आपण अशी डुलकी काढू शकलो असतो का? विचारा स्वतर्‍ला? उत्तर नाही असेल तर समजा की, आपण धोनीसारखं ग्रेट करिअर नाही करु शकत, कारण त्याचं कुल असणं, त्याचं शांत राहणं आणि फोकस्ड असणं आपल्याला नाही जमत.श्रीलंका संघ हारत होता, धोनी बॅटिंग करत होता. मुळात धोनीच्या परफॉर्मन्सवरही प्रश्नचिन्ह लावणारा हा काळ. असा कठोर की तुम्ही काल किती परफॉर्म केलं, तुम्ही किती ग्रेट आहात याच्याशी कुणालाच काही देणंघेणं नाही. ग्रेट धोनीवर पण लोक कालबाह्य होण्याचे आरोप करणारच. मग आपल्या करिअरचा विचार करा, आपण तर धोनीइतकी वैयक्तिक आणि सांघिक कर्तबगारीही गाजवत नाही. आणि तरी वाटतं की, आपलं करिअर धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसारखं भन्नाट असावं. ते कसं जमणार?जमावं असं वाटत असेल तर धोनीकडून दोन गोष्टी शिकायला हव्यात.1) शांत राहणं, अ‍ॅक्शन घेणं, रिअ‍ॅक्शन बंद.आपण सगळे सतत इतरांना रिअ‍ॅक्शन देत राहतो. कुणी अपमान केला, टोचून बोललं, आपल्याला डिवचलं, हरवलं की आपण रिअ‍ॅक्ट करतो. त्यानं गोष्टी अजून बिघडतात. धोनी तसं करत नाही. तो डोकं शांत ठेवतो, स्वतर्‍ला जे करायचं तेच करतो. दुसर्‍याच्या कण्ट्रोलमध्ये असलेली सिच्युएशन आपल्या हातात घेतो. आणि म्हणून त्याला हवे तसे रिझल्ट मिळतात.2) दुसरं म्हणजे तो जेव्हा हरत असतो, त्याचा परफॉर्मन्स होत नाही तेव्हा तो बोलघेवडेपणा करत नाही. इतरांकडे बोट दाखवत नाही. तो शांत राहतो. काय चुकतंय हे तपासतो. ते बदलतो. स्वतर्‍वर काम करतो. आणि शांतपणे आपल्या परफॉर्मन्सने उत्तर देतो.हे सारं आपण करतो का?उत्तर होकारार्थी येणं तसं अवघड. म्हणून तर धोनी ग्रेट होतो आणि आपण आपलं करिअर कुठं चालललोय म्हणून चिडचिडतो, तसं कशाला करायचं?