शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सगळीकडे पुढे, पण पैशाच्या गणितात बायका मागे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 18:15 IST

पैशाच्या व्यवस्थापनासंदर्भात स्त्रिया नेमक्या काय चुका करतात?

ठळक मुद्दे पैशाची गोष्ट आली की महिला कायम त्याला शेवटच्या क्रमांकावर ठेवतात.पैशांच्या व्यवहारांच्या बाबतीत कोणतीच पूर्वतयारी बºयाचदा महिलांनी केलेली नसते.स्वत:च्या नावावर काही प्रॉपर्टी आहे की नाही याकडे महिलांनी लक्ष द्यायला हवं.जॉर्इंट प्रॉपर्टी तसंच आपल्याला स्वाक्षरीचा अधिकार आहे की नाही हेही तपासून पाहायला हवं.

- मयूर पठाडेमहिलांच्या कर्तृत्वाला कोणीही बांध घालू शकत नाही आणि त्यांना थोपवू शकत नाही, हे काय आता सांगायला हवं? असं एकही क्षेत्र नाही, जिथे त्यांनी आपला झेंडा रोवला नाही.. असं एकही क्षेत्र नाही, ज्या ठिकाणी कोणी बोट दाखवू शकेल..पण.. असं असलं तरी एका गोष्टीत मात्र महिला कायम मागे पडत असल्याचं दिसतं. भले त्या आकाशीचे चंद्र-सूर्य तोडून आणतील, पण आपल्या फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये त्या कमी का पडतात? पैशांचं योग्य व्यवस्थापन करण्याकडे त्या लक्ष का देत नाहीत? आपल्याच हक्काच्या पैशाकडे आणि प्रॉपर्टीकडे त्या जाणीवपूर्वक का बघत नाहीत? अगदी त्या स्वत: कमावत्या असल्या, उच्च पदावर असल्या तरीही पैशांच्या व्यवस्थापनाकडे त्या फारसं लक्ष देत नाहीत.का होतं असं?लहानपणापासून एकतर वडील, भाऊ नाहीतर नवरा यांच्याकडेच पैशाचं व्यवस्थापन असल्याचं आपण पाहतो. महिलांनही ते विनातक्रार मान्य केल्याचं बºयाचदा दिसतं. सगळ्याच महिला या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करतात असं नाही, पण सर्वसाधारणपणे असं चित्र मात्र नेहेमी पाहायला मिळतं..

कोणत्या आहेत या चुका?१- महिला घरात अगदी प्रत्येकाचं करतील, जाणीवपूर्वक लक्ष देतील, पण पैशाची वेळ आली की, ती गोष्ट मात्र कायम त्यांच्या लिस्टमध्ये शेवटच्या क्रमांकावर असते. त्याच्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. ही गोष्ट त्यांनी टाळायला हवी. कारण वेळ म्हणजेदेखील पैसाच आहे.२- पैशाच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत त्या जणू काही निरक्षरच आहेत असं वाटावं अशीच त्यांची भूमिका असते. पैशांचे सारे व्यवहार महिलांना माहीतच हवेत. अगदी नोकरीतदेखील आपल्याला कोणत्या सोयी-सवलती आहेत, याकडे महिला फारसं लक्ष देत नाहीत. त्या सवलतींचा वापर महिलांनी करायला हवा. वेगवेगळे इन्शुरन्स माहीत करून घ्यायला हवेत. अडचणीच्या वेळी कुठून पैसे उपलब्ध होतील याची खातरजमा करायला हवी.३- पैशांच्या व्यवहारांच्या बाबतीत कोणतीच पूर्वतयारी बºयाचदा महिलांनी केलेली नसते. नवरा बघतोय ना सगळं काही, मग आपल्याला त्यात लक्ष घालायची गरज नाही, असं त्यांना वाटत असतं, पण अलीकडे घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढलं आहे, अचानक एखाद्या वेळी पतीचा मृत्यूही होऊ शकतो, दुर्दैवानं असं काही घडलं की काय करायचं असा मोठाच प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. तो टाळण्यासाठी सजग राहाणं गरजेचं आहे.४- आपण स्वत: कमावलेल्या पैशांचही व्यवस्थापन बºयाचदा महिला करीत नाहीत. त्याचा नंतर तोटाच होतो.५- लग्न झाल्यानंतरही आपल्या स्वत:च्या नावावर काही प्रॉपर्टी आहे की नाही याकडे महिलांनी लक्ष द्यायला हवं. जॉर्इंट प्रॉपर्टीकडेही लक्ष द्यायला हवं. आपल्याला स्वाक्षरीचा अधिकार आहे की नाही हेही तपासून त्याप्रमाणे बदल करुन घ्यायला हवेत.६- समजा नाही समजत आपल्याला पैशांचं गणित फारसं, पण मग त्यासाठी फायनान्शिअल अ‍ॅडव्हायझरचा सल्ला तर आपल्याला घेता येतो ना?- तो घ्या आणि आपला पैसा सुरक्षित ठेवा, वाढवा..