शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दहावीची परीक्षा -कृतिपत्रिका , सामाजिक शास्त्र - १ (इतिहास, राज्यशास्त्र)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 11:04 IST

इयत्ता दहावीची परीक्षा जवळ आली आहे. यावर्षी नवीन अभ्यासक्रमावर आधारित कृतिपत्रिका येणार आहे. नवीन अभ्यासक्रम, मुलांची अभिव्यक्ती व्यक्त करणारा आहे. इथे घोकंपट्टीला वाव न देता मुलांच्या आकलनावर व विचारशक्तीवर भर दिला आहे. ही नवीन कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना यश देणारी आहे.

ठळक मुद्देदहावीची परीक्षा -कृतिपत्रिका , सामाजिक शास्त्र - १ (इतिहास, राज्यशास्त्र)

दहावीची परीक्षा - सामाजिक शास्त्र - १ (इतिहास, राज्यशास्त्र)विद्यार्थी मित्रांनो!इयत्ता दहावीची परीक्षा जवळ आली आहे. यावर्षी नवीन अभ्यासक्रमावर आधारित कृतिपत्रिका येणार आहे. नवीन अभ्यासक्रम, मुलांची अभिव्यक्ती व्यक्त करणारा आहे. इथे घोकंपट्टीला वाव न देता मुलांच्या आकलनावर व विचारशक्तीवर भर दिला आहे. ही नवीन कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना यश देणारी आहे.आता तुमचा दहावीचा अभ्यासक्रम शिकवून झाला असेल, आता तुम्हाला स्वअभ्यास करावा लागत आहे. मनन चिंतनाचे दिवस आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये या कृतीपत्रिकेबद्दल उत्सुकता, थोडी भीती वाटत असणार. पण सतत सराव, वाचन, चिंतन केल्यामुळे आपण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाल, अशी अपेक्षा आहे. आपण कृतिपत्रिकेचा आराखडा बघू.इतिहास- ४० गुण + राज्यशास्त्र -२० गुण =६० गुणविभाग ४ : इतिहास - राज्यशास्त्रबोर्डाने प्रसारित केलेला कृतिपत्रिकेचा नवीन आराखडा 

  • नोंद : इतिहास व राज्यशास्त्र हे दोन्ही विषय एकाच उत्तरपत्रिकेत सोडवायचे आहेत.
  • ६० गुणांची कृतिपत्रिका सोडवण्यासाठी २.३० तासांचा कालावधी असेल.

इतिहासप्रश्न क्र.                                                                              प्रश्नप्रकार                               गुण   विकल्पासह गुण

प्र. १ (अ)                    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.                   ४           ४                                  (४ उपप्रश्न असतील. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)

प्र. १ (ब)             पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करुन लिहा.              ४         ४                      (या प्रश्नप्रकारात ४-४ जोड्यांचे चार गट दिले जातील. प्रत्येक गटातून चुकीची                       असलेली एक जोडी ओळखून दुरुस्त जोड्या लिहिणे अपेक्षित आहे. चारही                                 उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)

प्र. २ (अ)                            दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा.                                                          ४        ६                  (या प्रश्न प्रकारात पाठातील एखाद्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित चित्ररुप              आकृती पूर्ण करणे अपेक्षित आहे. यात ‘संकल्पनाचित्र पूर्ण करा’ ‘तक्ता पूर्ण करा,’           ‘कालरेषा तयार करा’, ‘ओघतक्ता तयार करा’, ‘घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी            दर्शवा’ असे प्रश्न्रप्रकार येतील. ३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडविणे  अनिवार्य आहे.)

प्र. २ (ब)           टिपा लिहा/संकल्पना स्पष्ट करा. (३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडविणे.)      ४       ६प्र. ३ (अ)                पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.                                                                       ६       १५                       (यात ५ विधाने असतील. त्यापैकी कोणतीही २ विधाने सकारण स्पष्ट करणे.)प्र. ३ (ब)                    थोडक्यात उत्तरे लिहा.                                                                                    ६          ९                       (यात ३ उपप्रश्न असतील. त्यांतील कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)प्र. ४            दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.                            ४             ४                (उताऱ्यावरील प्रश्न हे केवळ लेखन, वाचन तपासणारे नव्हेत; तर इतिहास विषयाचे                    ज्ञान व आकलन तपासणारे असतील. यात प्रत्येकी १ गुणाचे २ प्रश्न व २ गुणांचा                                  १ मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल.)प्र. ५              पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.                                                                           ८          १२                     (यात पुढील प्रश्नप्रकारांपैकी कोणतेही ३ प्रश्नप्रकार विचारले जातील.                             त्यापैकी २ उपप्रश्न सोडविणे अपेक्षित आहे.)

  1.  तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा.
  2. ऐतिहासिक प्रक्रिया / टप्पे सविस्तर स्पष्ट करा.
  3.  साम्य व फरकाचे मुद्दे शोधा.
  4.  दोन घटनांमधील परस्परसंबंध/कारणमिमांसा लिहा.
  5. विस्तृत निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहा.
  6.  चित्राचे/आकृतीचे निरीक्षण करुन प्रश्नांची उत्तरे लिहा.

                                                                                                                             एकूण गुण           ४०         ६०

  • प्रश्न १ अ, हा पर्यायी प्रश्न आहे. यात विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळतील.  ‘ब’मध्ये चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करुन लिहा.या प्रश्नप्रकारात चार - चार जोड्यांचे गट दिलेले असतील. विद्यार्थ्यांनी सर्व गट लिहिण्याची गरज नाही.फक्त ‘अ’ गट तसाच ठेवून ‘ब’ गटातील उत्तर बदलून लिहावे. 
  • प्रश्न २ मधील ‘अ’ संकल्पनाचित्र पूर्ण करा. हा प्रश्न विद्यार्थ्यांना गुण मिळवून देणारा आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन असणे आवश्यक आहे. 
  • प्र. २मधील ‘ब’ टिपा/संकल्पना स्पष्ट करा, असा आहे. या प्रश्नाला प्रत्येकी दोन गुण आहेत. त्या उत्तरासाठी चार मुद्दे अपेक्षित आहेत. 
  • प्रश्न ३ मध्ये ‘अ’ आणि ‘ब’ हे विधाने सकारण स्पष्ट करा व थोडक्यात उत्तरे लिहा, असे आहेत. या प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद लिहावी लागतात. प्रत्येकी तीन गुणांना कमीत कमी सहा मुद्दे अपेक्षित असतात. 
  • प्रश्न ४ हा परिच्छेदावरील असा नवीन प्रश्न आहे. तो मुक्तोत्तरी प्रश्न असू शकतो. तसेच आकलनावर आधारित आहे. या प्रश्नात एक-एक गुणांचे दोन, तर दोन गुणांचा एक लघुत्तरी प्रश्न विचारलेले असतील. या प्रश्नप्रकारात आपल्याला सर्व गुण मिळू शकतात. 
  • प्रश्न क्र. ५ हा दीर्घोत्तरी प्रश्न महत्त्वाचा आहे. यात तीन दीर्घोत्तरी प्रश्न विविध प्रकारांनी विचारले जातील. तुलना - फरक सांगा. तक्ता लिहा, चित्रे ओळखा व त्याची उत्तरे लिहा इत्यादी स्वरुपाचे प्रश्न असतील. या प्रश्न प्रकारासाठी पाठ्यपुस्तकातील सर्व चित्रांचा परिचय करुन घ्या. 
  • हा दीर्घोत्तरी प्रश्न लिहितांना त्या प्रश्नाला अनुसरुन प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे. उदा. पर्यटनाचे प्रकार लिहा. या प्रश्नाला पर्यटनाची व्याख्या, तो कोणत्या पातळीवर व्यवसाय चालतो इत्यादी प्रस्तावना आवश्यक आहे. त्यानंतर पर्यटनाच्या प्रकारांची नावे लिहून त्याचे उपमुद्दे घालून स्पष्टीकरण करावे, तसेच प्रश्नाच्या उत्तराला शेवटही असावा. म्हणजे या प्रश्नाचा परिणाम काय झाला, ते लिहावे. पर्यटनक्षेत्र कसे विस्तारले आहे. त्यातून रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. असा साधारणत: शेवट करावा, म्हणजे परीक्षकाला आपल्याला या प्रश्नाचे आकलन झाले आहे. ते समजते व चांगले गुण प्राप्त होतील.

राज्यशास्त्राचा आराखडाराज्यशास्त्रप्रश्न क्र.                                                     प्रश्न प्रकार                                                 गुण   विकल्पासह गुणप्र. ६                                    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य प्रर्याय लिहा.                                   ४       ४(दिलेल्या ४ पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहिणे. यात प्रत्येकी १ गुणाचे ४ उपप्रश्न असतील. )प्र. ७                        पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.                           ४        ६

(दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहा. चूक विधान व बरोबर विधान या दोन्हींसाठी स्पष्टीकरण आवश्यक आहे. चूक की बरोबर यास १ गुण व स्पष्टीकरणाला १ गुण. ३ विधानांपैकी कोणतीही दोन विधाने सोडविणे अपेक्षित आहे.)प्र. ८ (अ)                        पुढील संकल्पना स्पष्ट करा.                                                       ४       ६ 

(यात दिलेल्या ३ संकल्पनांपैकी कोणत्याही दोन  संकल्पना स्पष्ट करणे अपेक्षित आहे. )प्र. ८ (ब)                    दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.                                                      ४         ६(या प्रश्नप्रकारात ‘तक्ता पूर्ण करा’, ‘कालरेषा पूर्ण करा’, ‘पायऱ्या लिहा’, ‘ओघतक्ता पूर्ण करा’, संकल्पनाचित्र पूर्ण करा, असे प्रश्नप्रकार असतील. दिलेल्या ३ उपप्रश्नांपैकी २ उपप्रश्न सोडविणे अपेक्षित आहे.)प्र. ९                            पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.                                             ४       ८(या प्रश्नप्रकारात चारपैकी दोन उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)                                                                                                                     एकूण गुण  २०      ३०

  • प्रश्न ६ हा बहुपर्यायी प्रश्न आहे. यात ४ प्रश्न आहेत. इथेही पाठ्यपुस्तकाचे वाचन सखोल हवे. इथे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.

 

  • प्रश्न ७ विधाने चूक की बरोबर तेही सकारण स्पष्ट करायचे आहे. यात विधाने चूक की बरोबर लिहिले की, एक गुण मिळणार आहे व त्याच्या स्पष्टीकरणाला एक गुण मिळणार आहे. 
  • प्रश्न ८ अ. संकल्पना स्पष्ट करा. या प्रश्नप्रकारासाठी पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. पाठ्यपुस्तकातील संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतील, तर त्या चांगल्या पध्दतीने लिहिता येतील. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असून साधारणत: चार मुद्दे अपेक्षित असतात. 
  • प्र. ८ ब. मध्ये संकल्पना चित्र, कालरेषा इत्यादीच्या प्रश्नात विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळू शकतात. पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन आवश्यक आहे. 
  • प्रश्न ९ हा राज्यशास्त्राचा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. या प्रश्नात स्वमताचे प्रश्न असणार आहे. मुक्तोत्तरी प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे लिहितांना ‘मी’ कर्ता समजून लिहावीत. यातील काही प्रश्नांची उत्तरे पाठ्यपुस्तकांत असतीलच असे नाही. यासाठी तुम्हाला संदर्भसूचीचा वापर करून उत्तरे तयार करावी लागतील. तुमची मते मांडायची आहेत. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील संकल्पना, पाठ्यांश समजलेला असला पाहिजे. जर उत्तर येत नसेल तर विसंगत उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू नका. पाठ्यपुस्तकातील चौकटीतील प्रश्नही तयार करून ठेवा. 
  • आतापर्यंत आपण पेपरचा आराखडा समजून घेतला.
  • अभ्यास कसा करायचा ते पाहू. 
  • ज्याची बौध्दिक क्षमता उच्च पातळीची व मध्यम पातळीची आहे. त्यांनी पाठ्यपुस्तकांचे सखोल वाचन केले पाहिजे.
  • उत्तरपत्रिकेत प्रत्येक प्रश्न व प्रश्नक्रमांंक बरोबरच लिहावा
  • दीर्घाेत्तरी उत्तरात महत्त्वाचे मुद्दे अधोरेखीत करावे.
  • दीर्घोत्तरी प्रश्नांत्तरांचा लिहून लिहून सराव करावा.
  • दीर्घोत्तरी प्रश्नोत्तरे लिहिल्यानंतर ती उत्तरे स्वत:च तपासावीत व विसरलेले मुद्दे नोंदवून लक्षात ठेवावे.
  • परीक्षेआधी कमीत कमी पाच कृतिपत्रिका लिहून विषय शिक्षकांकडून तपासून घ्याव्यात.
  • झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करू नये.
  • प्रत्येकाने वेळेचे नियोजन आपल्या क्षमतेनुसार करावे.
  • पेपर १० मिनिटे आधी होईल, असे नियोजन करावे.

 

  • असा अभ्यास केल्यामुळे पेपरला जाताना तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल व तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल. ज्या विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता कमी आहे त्यांना ही नवीन कृतिपत्रिका यश मिळण्यास सोपी आहे. पास होण्यापुरते गुण मिळू शकतील. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत अभ्यास केला नाही. त्यांनी उरलेल्या थोड्यावेळात वस्तूनिष्ठ प्रश्न व लघुत्तरी प्रश्नांची उत्तरे चांगली तयार केली तर त्यांनाही यश मिळणे कठीण जाणार नाही. 
  • परीक्षा केंद्रात गेल्यावर काय कराल? 
  • शेवटच्या क्षणापर्यंत वाचत बसू नका.परीक्षा केंद्रावर गेल्यावर एकमेकांशी उत्तरांची चर्चा करु नका.
  • कारण एवढ्या कमी वेळात आपण सर्व आठवायला गेलो आणि आठवले नाही की आपल्यातला आत्मविश्वास कमी होतो.
  • पेपर हातात मिळाला की, वाचायला वेळ दिलेला असतो, तेव्हा तो पेपर नीट वाचा.
  • आपण कोणती उत्तरे लिहिणार आहोत ते ठरवा व मुद्दे आठवून ठेवा.
  • पेपर दोन्ही बाजूंनी समास सोडून आखावा.
  • पेपरमध्ये कोणतेही आक्षेपार्ह चिन्ह, शब्द, जप, सूचना लिहू नये.
  • पेपर १० मिनिटे आधी पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. 
  • अशा प्रकारे आपण घोकंपट्टीवर भर न देता आकलनावर भर दिला, पाठ्यपुस्तकाचे वाचन सखोल केले व दीर्घोत्तरी प्रश्नांचा लिहून सराव केला तर आपल्याला या विषयाची अजिबात भीती वाटणार नाही. उत्तम यशही प्राप्त होईल.आपणाला परीक्षेसाठी शुभेच्छा...! 
  • नेहा शेखर शेट्येफाटक हायस्कूल, रत्नागिरी
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा