शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या सीव्हीत या 3 चुका आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 17:06 IST

सीव्ही लिहिणं तसंही अवघड, पण या टिपीकल चुका करत असाल तर लोक तुमचा सीव्ही कचरापेटीतच टाकतील!

ठळक मुद्देसीव्ही म्हणजे आत्मचरित्र नव्हे.इतरांचा सीव्ही कॉपी करू नये.एक पानापेक्षा मोठाय तुमचा सीव्ही?

सीव्ही तर काय हल्ली सगळीकडेच द्यावा लागतो. आपण देतोही. पुन्हा पुन्हा सीव्ही अपडेट करतो. पण ते करताना आपल्या सीव्हीत काही चुका होताहेत का, हे तपासून पहायला हवं. बहुसंख्य लोक सीव्ही लिहिताना 3 चुका हमखास करतात. आणि मग नोकरी मिळत नाही म्हणून पस्तावतात. तुमचा सीव्ही पहा. त्यात या 3 चुका आहेत का?

कारण त्या असतील तर तुमचा सीव्ही हा इतरांसारखाच दिसतो. कॉपी पेस्ट. त्यात तुमचं यश, वेगळेपण, कामाचा उरक, तुमचं कौशल्य हे सारं लपून जातं. आणि उरतो फक्त एक कागद. असं करू नये. आपला सीव्ही हे आपल्या व्यक्तिमत्वाचं एक रुप, आपली ओळख वाटली पाहिजे. सीव्ही मोठा नाही, तर अर्थपूर्ण, आकर्षक आणि नेमका असावा.

सीव्ही लिहिता येणं हे एक स्किल आहे, पण निदान काही चुका तरी आपण हमखास टाळू शकतो.

 

1) ऑबजेक्टिव्ह

बहुसंख्य लोक आपल्या सीव्हीमध्ये सुरुवातीलाच हे ऑबजेक्टिव्ह प्रकरण लिहितात. कशाला? म्हणजे आय अ‍ॅम लूकिंग फॉर अ जॉब विज गिव्हज चॅलेंजेस .वगैरे भरताड कशाला लिहिता? त्याचा काहीही उपयोग नाही. हे कॉपी पेस्ट आहे हे सगळ्यांना कळतं. त्यापेक्षा दोन ओळीत असं काहीतरी लिहा, जे वाचून हा उमेदवार वेगळा आहे हे वाचणार्‍याला कळेल!

2. पॅरा कशाला?

लांब लचक वाक्य. आठ आठ पॅराग्राफ करतात अनेकजण. त्याचा काय उपयोग. निबंध लिहू नका. थोडक्यात, पॉईण्टर्समध्ये, कमीत कमी शब्दात स्वतर्‍विषयी काय ते सांगा.

3. अचिव्हमेण्ट वेगळया, जबाबदार्‍या वेगळ्या.

तुम्ही करत असलेलं काम हे काही तुमचं कर्तृत्व नाही. ती तुमची जबाबदारी. याहून वेगळे पुरस्कार, काही विशेष प्रोत्साहन, कौतूक असं काही असेल तर ते लिहा. टार्गेट पूर्ण केलं, हे काही कर्तृत्व नव्हे, ती तर जबादारीच. त्यामुळे आपण काम काय करतो, हे वेगळं लिहा. आपलं कर्तृत्व म्हणजेच अचिव्हमेण्ट वेगळ्या लिहा.