शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजात आहात? तरी सोशल ड्रिंक करता मग तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 13:06 IST

इस्त्रायलचा एक अभ्यास सांगतो, जी मुलं कॉलेजात असल्यापासून दारूच्या व्यसनात अडकतात, त्यांना नोकर्‍या मिळण्याची शक्यता कमी असते.

ठळक मुद्देसोशल ड्रिंक या नावाखाली पिणं टाळाच.

प्यावे की पिऊ नये हा व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असला तरी दारू हे व्यसन आहे हे तर सर्वमान्य आहे. त्यात हल्ली सोशल ड्रिंकचं वारं कॉलेजातही पोहचलं आहे. अनेकजण कॉलेजची पायरी चढत नाही तोच मित्रांच्या दबावामुळे, फॅशन म्हणून, स्टाईल म्हणून, अनुभव घ्यायचा म्हणून, बंडखोरी म्हणून किंवा निव्वळ व्यसन म्हणून दारू प्यायला लागतात. म्हणतात की आम्ही कधीमधीच पितो. महिन्यातून फार तर दोनदा किंवा चारदा. पण हे एवढंही पिणं, तुमच्या करिअरवर वाईट परिणाम करू शकतो, तुमची नोकरी मिळण्याची शक्यताच कमी होऊ शकते.

इस्त्रायलच्या तेल अवीव विद्यापीठातील पीटर बम्बर्गर यांनी केलेला हा अभ्यास अलिकडेच एका सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. 2014 ते 2016 या काळात महाविद्यालयात शिकणार्‍या 827 मुलांशी बोलून त्यांनी हा अभ्यास केला.त्यांचं म्हणणं आहे की, जी मुलं कॉलेजात सर्रास ड्रिंक करतात, त्यांचे फोटो सोशल मीडीयात टाकतात, अभ्यासाकडे त्यातून दुर्लक्ष्य करतात, लेट नाईट जागतात त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता अन्य मुलांपेक्षा किमान 10 टक्के कमी होते. आणि नोकरी मिळाली तरी ती टिकण्याची शक्यताही कमी होते.त्यामुळे तुम्ही कॉलेजातच प्यायला लागला आहात, तर व्यसनाचं कीड स्वतर्‍ला लावून घेताहात हे लक्षात ठेवा.