शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

मनासारखा जॉब मिळत नाही? मग जो मिळेल तो जॉब करा, कारण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 13:43 IST

रिकामपण खातं, त्याचे घातक परिणाम आरोग्यावर होतात.

ठळक मुद्देआपल्याला हवा तसा जॉब मिळाला नाही तर घरी बसेन, ही वृत्ती तुम्हाला कायमचं घरी बसवू शकते!

मी गॅप घेतलीये, आय अ‍ॅम फ्री, आय रिझाईन अशी स्टेटस आताश फेसुबकवर दिसतात. लोक त्यांचं अभिनंदन करतात. काहींना मत्सरही वाटतो की आपण काय नोकरीच्या घाण्याला जुंपलोय. लोक कसे राजीनामा देऊन मोकळे होतात. काही जणांना वाटतं की चांगला जॉब मिळाल्याशिवाय अजिबात कुठं नोकरीच करणार नाही. त्यापेक्षा अभ्यास करीन. खाईन तर तुपाशीच असा त्यांचा अ‍ॅटिटय़ूड. पण असं नोकरीसोडून घरी बसणं महागात पडू शकतं, म्हणजे आर्थिकदृष्टयाच नाही तर तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावरही त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे नोकरी नसण्यापेक्षा नोकरी असलेली बरी हे कायम लक्षात ठेवा.अलिकडे एका ब्रिटिश संस्थेचा अभ्यास प्रसिद्ध झाला. हा अभ्यास युके हाऊसहोल्ड स्टडी नावानं उपलब्ध आहे. तर नोकरी बदलणार्‍या, नोकरी बदलून नवी नोकरी शोधण्याच्या काळात असलेल्या, ट्राझिटमधल्या, गॅप घेतलेल्या, रागानं तडकाफडकी राजीनामा देऊन घरी बसलेल्या, ऑफिसनं नारळ दिलेल्या अनेकांचा या  सव्र्हेस अभ्यास करण्यात आला. आणि अभ्यास कशाचा तर नोकरी नसतानाच्या काळात यांच्या आरोग्यावर काय परिणाम झाले याचा. ते परिणाम मानसिक, शारीरिक, स्ट्रेस लेव्हल, र्‍हदय विकार, पचनशक्ती, प्रतिकारशक्ती या वेगवेगळ्या टप्प्यात मोजले गेले. आणि त्यात असं दिसून आलं की, मानसिक ताण प्रचंड वाढलेला असतो. त्यातून एकटेपणा येतो. रुटीन बिघडतं. आर्थिक ताण असताताच. त्यात पचनक्षमता बिघडते. आरोग्य घसरतं. आणि एकुणच आरोग्याची वाताहात होते.त्या तुलनेत अशा माणसांचं आरोग्य बरं दिसतं जे नोकरीला चिकटून होते. नोकरीवर नाराज होते, कमी पैसे मिळतात म्हणून नाखुश होते, त्यांना नोकरीत ताण होता, जीव नको झाला म्हणत होते तरी त्यांचं आरोग्य हे नोकरी सोडून घरी बसणार्‍यांपेक्षा चांगलं होतं.ही परिस्थिती जर ब्रिटनमधली असली तर आपल्याकडे मुळातच नोकर्‍यांची चणचण असताना हवा तसा जॉब मिळाल्याशिवाय नोकरीत करणार नाही, हा अ‍ॅटिटय़ूड नुस्ता घातकच नाही तर वेडगळ ठरू शकतो.त्यापेक्षा आपल्या क्षेत्रातला जो त्यातला त्यात बरा वाटेल तो जॉब घ्या. तिथं शिका. पुढची संधी मिळण्याची वाट पहा. रिकामपण फार वाईेट हे लक्षात ठेवा.