शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ह्या 3 चूका करताय? म्हणून तुमचं प्रमोशन होत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:33 IST

आपण काम खूप करतो, पण ते खूप काम, ढोर मेहनत आणि चाकोरी आपल्याला पुढे जाऊ देत नाही.

ठळक मुद्देस्मार्ट काम करा, काम प्रेझेण्ट करा, मागेमागे राहू नका.

-चिन्मय लेले

आपण सगळेच मन लावून काम करतो, म्हणजे आपल्याला तरी तसंच वाटतं. पण तरी आपलं करिअर शाइन करत नाही, काही जेमतेम कुवतीची माणसं आपल्यापुढे निघून जातात, पण आपल्याला हवं तसं यश मिळत नाही. आपण ढोर मेहनत करुनही मागेच पडतो, असं का होतं? याची अनेक उत्तरं आहेत, पण तरी तीन चूका आपण हमखास करतो ज्यानं आपल्या करिअरचा स्पीड मंदावतोच, आपलं कामही झाकोळलं जातं. या चूका तुम्हीही करताय का? तपासून पहा.

1) आपल्याला नेमकं काय करायचं हेच माहिती नाही.आहे त्या नोकरीचा कंटाळा येतो. हे काम नको होतं. पण पुढे काय? याचं उत्तर नसतं. आपल्या आहे त्याच नोकरीतही पुढे काय करायचं? तू काय करशील? या प्रश्नांची उत्तरं नसतात. आणि मग जे करतो तेच आवडत नाही इथंच गाडं अडतं. करिअर पुढे सरकायचं तर आपल्याला नेमकं काय करायचं हे ठरवता यायला हवं. ते चुकेलही, पण नेमकं हवं काय ते ठरवाच. त्यातून मग फोकस नाहीकाय करायचं हेच माहिती नाही, तर वर्तमानात फोकस काय करणार? भविष्याचं प्लॅनिंग काय करणार? नाहीच होतं. म्हणून मग आपण आहे तिथंच गोलगोल फिरतो. अनेकजण नोकर्‍या बदलतात पण करिअरवाढ होत नाही.

2) ढोर मेहनत करताय?आता ही काय चूक झाली का? पण आजच्या काळात ही चूकच आहे. म्हणजे होतं काय की आपण खूप काम करतो. पण तेच ते चाकोरीचं, रोजचं. बॉस काय म्हणतो रोजचं काम केलं ते ठीक, पण वेगळं काय केलं?मग आपण गप्प. कारण आपल्या कामात क्रिएटिव्हीटी नाही, वेगळेपणा नाही. नवीन काम करायला फुरसतच नाही. परिणाम, जे थोडं पण वेगळं करतात ते दिसतात. आपण मागेच. तेव्हा ढोर मेहनत सोडा. स्मार्ट व्हा. कामाचा प्राधान्यक्रम ठरवा.

3) काम दाखवता येत नाही.अनेकांना हे वाक्य आवडत नाही. पण आजकाल इतरांचं काम कुणाला दिसत नाही. बॉसला नाही, व्यवस्थापनाला नाही. ते आपण नीट दाखवलं पाहिजे. प्रेझेण्ट केलं पाहिजे. मांडलं पाहिजे. तरच लोक त्याची दखल घेतात. न बोलणार्‍याचे गहूही विकले जात नाही हे लक्षात ठेवलेलं बरं!