शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी शिक्षिकेस माहिती देण्याबाबत जिल्हा परिषदेची तत्परता! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:20 IST

एकाचवेळी एमएड महाविद्यालय आणि शाळेवरही  हजर असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कल्पना ठग नामक शिक्षिकेस  माहिती पुरविण्याबाबत जिल्हा परिषदेने कमालीची तत्परता  दाखविली. तसेच पोलिसांनीही तत्काळ अभिप्राय नोंदवून  आरोपी शिक्षिकेस अप्रत्यक्ष सहकार्य केल्याचे धक्कादायक  वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्देशिक्षिका कल्पना ठग प्रकरण पोलिसांनीही तत्काळ नोंदविला अभिप्राय

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: एकाचवेळी एमएड महाविद्यालय आणि शाळेवरही  हजर असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कल्पना ठग नामक शिक्षिकेस  माहिती पुरविण्याबाबत जिल्हा परिषदेने कमालीची तत्परता  दाखविली. तसेच पोलिसांनीही तत्काळ अभिप्राय नोंदवून  आरोपी शिक्षिकेस अप्रत्यक्ष सहकार्य केल्याचे धक्कादायक  वास्तव समोर आले आहे.सोनाळा येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत शिक्षिका  कल्पना भगवान ठग यांनी पंचायत समिती बुलडाणा अंतर्गत  चिखला येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळा येथे कार्यरत  असताना सन २0१२-१३ मध्ये नियमित बीएड  अभ्यासक्रमासाठी तर २0१३-१४ मध्ये एमएड  अभ्यासक्रमासाठी शाहू महाराज महाविद्यालय माळविहीर ये थे प्रवेश घेतला होता. यासाठी त्यांनी कोणत्याही सक्षम  अधिकार्‍यांची परवानगी घेतली नाही, तर दुसरीकडे चिखला  येथील शाळेतील हजेरीपत्रकावर आणि महाविद्यालयाच्या  हजेरीपत्रकावरसुद्धा सह्या करून शासनाची फसवणूक  केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर  फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले. यावरून  ४ सप्टेंबर २0१७ रोजी कलम ४२0 भादंविनुसार गुन्हा  दाखल करण्यात आला; पण याबाबत गोपनीयता न  बाळगण्यात आल्याने गटशिक्षणाधिकारी मदन आंधळे यांनी  तक्रार देण्यापूर्वीच ठग यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज  न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने पोलीस  प्रशासनाला ठग यांना अटक करण्यापूर्वी नोटीस देऊन ७२  तासांची मुदत देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, ठग यांनी  जामिनाकरिता काही कागदपत्रे मिळविण्यासाठी जिल्हा  परिषदेत शिक्षण विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज  करून मागणी केली असता त्यांना अवघ्या २४ तासांत  संबंधित कागदपत्र देण्यात आले. माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली असता त्यांना  महिनोगणती माहिती दिली जात नसल्याची अनेक प्रकरणे  प्रलंबित आहेत.