अमित सुनील बेंडवाल व त्याचा मित्र किरण गायकवाड हे १९ जुलै राेजी जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता बसलेले हाेते. या वेळी तेथे कृष्णा भास्कर पवार (रा. शिक्षक काॅलनी, चांडक ले आउट, बुलडाणा) व संतोष जाधव (रा. गोडे काॅलेजजवळ, बुलडाणा), किशोर ठाकरे (गोडे काॅलेजजवळ, बुलडाणा) तिघे आले. कृष्णा पवार याने लोखंडी राॅडने बेंडवाल याच्या हातावर व पायावर मारला. तसेच डाेक्यावरही राॅड मारला. तसेच बेंडवालकडे असलेला २० हजार रुपये किमतीचा माेबाइल व राेख २ हजार रुपये त्यांनी घेतले. किरण गायकवाड याने मला त्यांच्या तावडीतून सोडल्याने ते तिघे जण पळून गेल. या प्रकरणी बुलडाणा शहर पाेलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़
युवकास मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST