खामगाव : विहिरीत उडी घेवून युवकाने आत्महत्या केल्याची घटना जामोद ता.जळगाव येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. जामोद येथील किशोर रामभाऊ बढे (वय २२) या युवक बकऱ्या चराईचे काम करीत होता. दरम्यान काही दिवसांपासून त्याची वागणूक मनोरुग्णासारखी होती. मंगळवारी किशोर बढे याने घरातून पळ काढत जुना चालठाणा शिवारात असलेल्या रमेश किसन दलाल यांच्या शेतातील विहिरीत उडी मारली. किशोर धावत निघाल्याने त्याचे मागे असलेल्यांना ही घटना दिसून आली. मात्र ६० फूट खोल असलेल्या विहिरीत फक्त २ ते अडीच फुटच पाणी असल्याने किशोरच्या डोक्याला मार लागून त्याचा करुण अंत झाला.
विहिरीत उडी घेवून युवकाची आत्महत्या
By admin | Updated: April 19, 2017 18:55 IST