नांदुरा : तालुक्यातील येरळी येथे लाठ्या आणि कुºहाडीने एका खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री १० वाजता दरम्यान घडली. पुर्णा नदी काठावरील जिगांव धरण बुडित क्षेत्रात येणाऱ्या ग्राम येरळी येथील रहिवासी योगेश धोंडु घुये (वय २७) हा १९ जूनच्या रात्री १० वाजता आपल्या घराजवळुन जात होता. त्यावेळी शेजारीच राहणाऱ्या दत्ता ओंकार सपकाळ व महादेव ओंकार सपकाळ या दोघांनी जुना वाद उकरून काढत, योगेशशी वाद घातला. तसेच काठ्या आणि कुºहाडीचे घाव घातले. त्यामुळे योगेशचा मृत्यू झाला. या घटनेची नांदुरा पो.स्टे. येथे माहिती मिळताच नांदुरा ठाणेदार अरूण आगे, पीएसआय सचिन इंगळे यांनी त्वरीत घटनास्थळ गाठुन आरोपी दत्ता सपकाळ यास अटक केली. या प्रकरणी मृतकाची पत्नी शुभांगी योगेश घुये हिने नांदुरा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरून कलम ३०२, ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल केला.
येरळी येथे तरूणाचा खून; एकास अटक, एक आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:31 IST
नांदुरा : तालुक्यातील येरळी येथे लाठ्या आणि कुºहाडीने एका खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री १० वाजता दरम्यान घडली.
येरळी येथे तरूणाचा खून; एकास अटक, एक आरोपी फरार
ठळक मुद्देयोगेश धोंडु घुये (वय २७) हा १९ जूनच्या रात्री १० वाजता आपल्या घराजवळुन जात होता. दत्ता ओंकार सपकाळ व महादेव ओंकार सपकाळ या दोघांनी जुना वाद उकरून काढत, योगेशशी वाद घातला.काठ्या आणि कुºहाडीचे घाव घातले. त्यामुळे योगेशचा मृत्यू झाला.