शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रकखाली युवकाने घेतली उडी! नैराश्यातून संपविले जीवन; पिंपळगाव राजा येथे खळबळ

By अनिल गवई | Updated: September 14, 2022 21:26 IST

रस्त्यावर वर्दळीच्या वेळेत एका युवकाने चक्क ट्रकखाली उडी घेऊन जीवन संपविले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: रस्त्यावर वर्दळीच्या वेळेत एका युवकाने चक्क ट्रकखाली उडी घेऊन जीवन संपविले. ऐन दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खामगाव तालुक्यातील पिंपळगावराजा येथे एकच खळबळ उडाली आहे. नैराश्यातून युवकाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी या युवकाला ट्रकने धडक दिल्याची चर्चा होती. मात्र, रस्त्यावरील एका दुकानात लागलेल्या सीसी कॅमेऱ्यामुळे या घटनेचा उलगडा झाला.

शाहबाज अब्दुल रफीक असे मृतक युवकाचे नाव आहे. पिंपळराजा- खामगाव रस्त्यावरील स्टेट बँकेजवळ दुपारी हा युवक बराच वेळ उभा होता. दरम्यान, दुपारी या रस्त्याने एक कंटेनर जात होते. त्यावेळी कंटेनरचा समोरील भाग पुढे गेल्यानंतर मागील चाकामागे उडी घेतली. मागील चाकांमध्ये चिरडल्यागेल्याने त्याने प्रचंड आरडाओरड केली. आवाज ऐकून प्रत्यक्षदर्शी कंटेनरच्या दिशेने धावले.  अनेकांना कंटेनरने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचा समज झाला. त्याचवेळी काहींनी तातडीने त्याला खामगाव येथील रूग्णालयात हलविले. येथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.  मृतक शाहबाज हा पिंपळगाव राजा येथील कांदा व्यापारी रफीक भाई यांचा मुलगा होता. घटनेनंतर खामगाव- पिंपळगाव राजा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे घटनेचा उलगडा

खामगाव तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव राजा येथे दुपारच्यावेळी झालेल्या या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. नागरिक संतप्त झाल्यामुळे चालकाने काही समजण्याच्या आतच कंटेनरमधून उडी घेत, घटनास्थळ सोडले. त्याचवेळी काहींनी शाहबाजने आत्महत्या केल्याचे पोलीसांना सांगितले. त्यादिशेने तपास सुरू केल्यानंतर रस्त्यावरील एका दुकानात लागलेल्या सीसी कॅमेºयातील फुटेजची पाहणी केली. त्यावेळी या घटनेचा उलगडा झाला.

पिंपळगाव राजा येथील घटना अपघात नसून आत्महत्या आहे. घटनेसंदर्भातील सीसी फुटेज प्राप्त झाले आहेत. यात युवकाने ट्रकखाली उडी घेतल्याचे दिसून येत आहे. तपासाअंती याप्रकरणी आत्महत्येची नोंद घेतली जाईल. - सतिश आडेठाणेदार, पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा