शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत धक्क्याने युवकाचा मृत्यू, उघड्या विद्युत रोहित्राने केला घात

By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 19, 2023 13:22 IST

ग्रामीण भागातच नव्हे, शहराच्या ठिकाणीही अनेक विद्युत रोहित्र उघडे दिसून येतात.

सिंदखेड राजा : ग्रामीण भागातच नव्हे, शहराच्या ठिकाणीही अनेक विद्युत रोहित्र उघडे दिसून येतात. अशाच एका उघड्या विद्युत रोहित्राने घात केला. तालुक्यातील पिंपरखेड येथील अतिष नंदकिशोर राठोड (वय ३१) यांचा उघड्या असलेल्या विद्युत रोहित्राचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

अतिष राठोड हे आपल्या जनावरांना घराकडे घेऊन येत असताना बाजूलाच असलेल्या उघड्या डीपीचा त्यांना शॉक लागला. जबर शॉक लागल्याने अतिष राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांचा परिवार अडचणीत आला आहे.

दरम्यान, या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी तर मुख्य चौकातील विद्युत रोहित्र उघडे आहेत. अनेकांचे वायर खाली आलेले दिसून येतात. उघडे असेलेले हे विद्युत रोहित्र जीवघेणे ठरत आहेत. पिंपरखेड येथील युवकाचा उघड्या विद्युत रोहित्रामुळे मृत्यू झाला असून, नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.