पेट्रोल भरण्यासाठी आलेले लोकांचे नाव व सही घेण्यात यावेळी घेण्यात आली़ माेहिमेदरम्यान अनेकांनी दरवाढीविराेधात राेष व्यक्त केला़ ही स्वाक्षरी मोहीम मेहकर मतदारसंघात लोणार व मेहकर येथे घेण्यात आली़ या माेहिमेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भीमशक्तीचे नेते यांनीसुद्धा भेट दिली़ आंदाेलनात स्वाती पर्हाड उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी बुलडाणा, मेहकर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कलीम खान,भीमशक्तीचे भाई कैलास सुखदाने, प्रा़ विनोद परहाड, वसीम करेशी प्रदेश सचिव एनएसयुआय, युनूस भाई पटेल शहर अध्यक्ष अल्पसंख्यक काँग्रेस मेहकर, आरती दीक्षित शहर अध्यक्ष महिला काँग्रेस मेहकर, प्रा़ संजय वानखेड़े, रवीभाई मिस्कीन सरचिटणीस जिल्हा युवक काँग्रेस बुलडाणा, जुबेर नाज़िम कुरेशी उपाध्यक्ष मेहकर, आशिषबाप्पू देशमुख मेहकर, छोटूभाई गवळी मेहकर, रियाजभाई कुरेशी मेहकर, प्रकाश सुखदाने मेहकर,भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष गवई, वसीम कुरेशी, निसार शेख, इमरान शेख आदी उपस्थित हाेते़
लाेणार येथेही आंदाेलन
युवक काँग्रेसच्यावतीने लाेणार येथेही स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले़ यावेळी भारत राठोड तालुका अध्यक्ष लोणार युवक काँग्रेस,जुनेदभाई शेख जिल्हा सचिव एनएसयुआय बुलडाणा, आकिब कुरेशी तालुका सरचिटणीस युवक काँग्रेस आदींसह इतर उपस्थित हाेते़ या स्वाक्षरी मोहिमेचा आयोजन मेहकर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष यासीन कुरेशी व जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस रवी मिस्कीन व भारत राठोड अध्यक्ष लोणार तालुका युवक काँग्रेस यांनी केले हाेते़
110721\1824img-20210711-wa0059.jpg
स्वाक्षरी मोहीम राबविताना