शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरूणांनी संभाजी महाराजांचा आदर्श जोपासावा - गजानन शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 19:33 IST

धाड : आजच्या तरूणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन गजाननदादा शास्त्री यांनी धाडमध्ये आयोजित संभाजी राजे जयंती निमित्त व्याख्यानात प्रबोधन करताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनात सतत संघर्ष करून धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी बलीदान दिले. राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीमुळे संभाजी राजे घडले. त्यांचे चरित्राचा सखोल अभ्यासासह त्यांचा आदर्श आजच्या तरूणांनी घेण्याचे आवाहन प्रसिध्द व्याख्याते गजाननदादा शास्त्री यांनी धाडमध्ये आयोजित संभाजी राजे जयंती निमित्त व्याख्यानात प्रबोधन करताना केले.छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६० व्या जयंती पर्वावर धाडमध्ये बोराडे नगरात राजे संभाजी मित्र मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी पोलिस ठाणेदार संग्राम पाटील यांची उपस्थिती होती. गजानन दादा शास्त्री यांनी आपल्या कणखर आवाजात सुरूवातीला संभाजी महाराजांचा पोवाडा सादर करून तरूणांना मंत्रमुग्ध केले. आपल्या व्याख्यानात बोलताना ते म्हणाले की, आपल्या बालवयातच स्वराज्याची आणि धर्माची धुरा संभाजी महाराजांनी सांभाळत अनेक शत्रुंशी ते एकाचवेळी सतत लढा दिला. सोबतच धर्म, सामाजिक, सांस्कृतिक, राजकारण, युध्द या चौफेर विषयावर गाढा अभ्यास करून प्रत्येक क्षेत्रावर त्यांची पकड होती. विपरीत परिस्थितीत रयतेची त्यांनी काळजी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचा विस्तार करून गोरगरीब जनतेला न्याय दिला. यावेळी ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपल्या मनोगतातून तरूणांनी व्यसनाधिनता सोडून शरीर बळकट बनवून समाजसेवा करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शाहीर प्रमोद दांडगे व सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. यावेळी गावातील महिला व नागरिकांची उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक तरूणांनी व्यसन न करण्याची शपथ घेतली. संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष उबाळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सर्जेराव देशमुख तर आभार तायडे गुरूजी यांनी केले.