बुलडाणा: युवकांबरोबरच शाळकरी मुलांमध्येही आज तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन वाढले आहे. पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि तंबाखू असलेल्या पदार्थाची सार्वजनिक स्थळी सहज उपलब्धा यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकत आहे. काहीतरी नवी करण्याचे खुळ आणि खिशात खुळखुळणारा पैस्याने युवा पिढीला व्यसनाच्या मार्गाने मृत्यूच्या दारात आज उभे केले आहे . गेल्या पाच वर्षात आपल्याकडे तंबाखू व्यसनाचे प्रमाण वाढतच चालले आहे. रेल्वेस्टेशन, एस.टी. स्टँड अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, गुटख्याच्या नमुन्यांचे खुलेआम वाटप होताना दिसत आहे. आपल्यालाही रस्त्यावर, आडोसा बघून सिगारेटचा झुरका घेणारे शाळेच्या गणवेशातील मुलांचे टोळके दिसते, तेही साधारणपणे आठवीच्या वरच्या इयत्तांतील मुलांचे. कामाचा व्याप आणि जवाबदारीचे ओझ पेलतांना पालकांचेही आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एखादा मुलाने तंबाखू घ्यायला सुरुवात केली तर त्याला म्हणता म्हणता या व्यसनाची पदवी, पदव्युत्तर प्रगती करायला फारसा अवधी लागत नाही. सिगारेट, विड्या, गुटखा, मावा, हुक्का आदी वस्तूंचे कारखानदारही आपला बाजारातील खप कसा वाढेल याकरिता प्रयत्नशील आहे, तरुणपिढीला सिगारेट, मावा आणि गुटखा विकणारे आपले लक्ष करीत आहे. आपल्या ब्रँडशी युवकाची लवकरात लवकर ओळख कशी होईल व त्या ब्रँडचा तो कसा आहारी जाईल, याची जोरदार शर्यत सुरू असल्याचे दिसू लागले आहे. वाईट भाग असा की, हे प्रकरण केवळ सिगारेट वा गुटख्यावरच थांबत नाही तर तंबाखूचे व्यसन हे अन्य व्यसनाचा गेटवे असल्याचेही दिसत आहे.
तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढल
By admin | Updated: May 30, 2014 23:43 IST