संग्रामपूरः- सातपूडा पर्वत रांगेतून उगम असलेल्या आडनदी पात्रातील डोहात १९ वर्षीय यूवक बूडाल्याची रविवारी संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान धडली. वारी हनूमान येथील हनूमान मंदीराजवळ आडनदी पात्रातील डोहात नांदूरा तालुक्यातील अलमपूर येथील १९ वर्षीय वैभव बढे आंधोळीसाठी गेला असता डोहात बूडाला असून यूवकाला शोधण्याचे कार्य सूरू आहे. घटनेची माहिती सोनाळा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डोहात बुडवलेल्या युवकाला शोधण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आडनदी पात्राच्या डोहात यूवक बूडाला; वारी हनूमान येथील घटना, शोध सूरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 21:43 IST