शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सैलानी यात्रेसाठी भाविकांसह व्यापारी डेरे दाखल

By admin | Updated: March 10, 2017 01:41 IST

प्रशासन सज्ज; १२ मार्चपासून होईल यात्रेला प्रारंभ.

विठ्ठल सोनुने पिंपळगाव सैलानी (बुलडाणा), दि. ९- हजरत हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांचा भव्य यात्रा महोत्सव उद्या होळी पंचमी १२ मार्च पासून प्रारंभ होत आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून हिंदु मुस्लीम भाविक भक्त या यात्रेमध्ये सहभागी होतात. यात्रेला अवघे तिन दिवस शिल्लक असतांना सैलानी परिसरात यात्रेसाठी भाविकांसह व्यापारी वर्ग दाखल होत आहे. जिल्हा प्रशासनाही यासाठी सज्ज झाले आहे.जिल्ह्यासह राज्य व देशभरात भाविक यात्रेसाठी दोन ते तिन दिवसापूर्वी दाखल होतात.यामुळे भाविक सैलानी दर्गा परिसरामध्ये राहण्यासाठी झोपड्यांचे बांधत आहे. व्यापरी वर्ग आपले दुकाने थाटत आहे. यात्रेमध्ये सिनेमा थेटर, आकाश पाळणे, किराणा मालाची दुकाने, नारळाची दुकाने, झोपड्या बांधण्याच्या साहित्या दुकाने, शेरणी फुटाणे, खानावळीचे दुकाने थाटायला सुरुवात झाली आहे. गावात मोठय़ा प्रमाणात भाविक दखल होत असल्यामुळे त्यांची सोय करण्यासाठी स्थानिक नागरिक व दुकानदाराही कामामध्ये व्यस्त आहे. तर बुलडाणा पंचायत समितीने यात्रेच्या रस्त्यांची व दुकानाच्या ठिकाणांची आखणी केली आहे. सैलानी दर्गा ते जांभळीवाले बाबा हा मुख्य रस्ता प्रशासनाने शंभर फुटाचा ठेवला आहे. जेणेकरुन या रस्त्यावर भाविकांची गर्दी होणार आहे. याची प्रशासनाने दखल घेतली आहे.भाविकांसाठी गरम पाण्याची सोययात्रेसाठी देशभरातून येणार्‍या भाविकांसाठी प्रशासन व स्थानिक नागरिकांकडून सोय करण्यात येते, भाविकांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावे, याची व्यवस्था स्थानिकांकडून करण्यात आली आहे.२00 पोलीस कर्मचारी तैनातसैलानी बाबाच्या यात्रेसाठी सुरुवातीला बुलडाणा पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनखाली २00 पोलिस कर्मचार्‍यांच्या बंदोस्त ठाणेदार जे.एन.सैय्यद यांच्या मार्गदर्शनात ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यात्रेसाठी ३0 पोलिस अधिकारी व ५00 महिला व पुरुष कर्मचार्‍यांची मागणी प्रशासनाने केली आहे.