पिंप्री गवळी (मातोळा, जि. बुलडाणा) : तीन अपत्य असताना दोन अपत्य दाखवून अंगणवाडी सेविकेचे पद मिळविणार्या येथील अंगणवाडीतील एका सेविकेची निवड रद्द करण्यात आली. तसे आदेश बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पारित केले आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, मोताळा अंतर्गत पिंप्री गवळी येथील अंगणवाडी सेविका पदाकरिता १९ जून रोजी मुलाखत घेऊन आरती राऊत (रा. पिंप्रीगवळी) यांची सेविकापदी निवड केली. राऊत यांना तीन अपत्ये असूनही आपल्या प्रतिज्ञालेखावर केवळ दोन अपत्ये दर्शविल्याची तक्रार योगिता बर्हाटे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल केली होती. प्रकरणातील मूळ कागदपत्रे, शासन निर्णय आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद त पासण्यात आला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश पारित करून आरती राऊत यांचे अंगणवाडी सेविका पदी केलेली निवड रद्द केली.
अपत्यांबाबत चुकीची माहिती, सेविकेची निवड रद्द
By admin | Updated: October 9, 2014 00:33 IST