बुलडाणा : मागीलकाही दिवसापासून शहरातील बहुतांश एटीएम बंद आहेत.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकासह ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.हक्काचे पैसे मिळत नसल्यामुळे नागरिकांवर उसनवारी करण्याची वेळ आली आहे.शहरातील बहुतांश एटीएम हे शोभेची वस्तु बनले आहेत. सर्व सामान्यासहग्राहकांची हेळसांड थांबविण्यासाठी एटीएममध्ये मुबलक पैसे टाकण्यात यावे,या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने डफडे वाजवत येथील स्टेट बँकमहाराष्ट्र बँकेच्या एटीएमला अगरबत्ती पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.केंद्र शासनाने नोव्हेंबर महिन्यात नोटा बंदी केली. दरम्यानच्या काळातमोठ्या प्रमाणावर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे पैसेकाढण्यासाठी बँका एटीएम समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याहोत्या. नोटा बंदी होवून सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला असतानादेखीलअद्यापही एटीएम समोरील नागरिकांच्या रांगा कमी झाल्या नाहीत. पंधरा तेविस दिवसापासून शहरातील बहुतांश एटीएम मध्ये पैशाचा ठणठणाट आहे. हक्काचेपैसे मिळत नसल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. कॅशलेसच्यानावाखाली केंद्र सरकारने बँकांना पैसे पाठविणे कमी केले आहे. त्यामुळेसर्व सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे झोपलेल्यासरकारला जागे करण्यासाठी आज शहर काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक महाराष्ट्रबँकेसमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी एटीएमचे पूजन करण्यातआले. या आंदोलनाचे नेतृत्व शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. शरद राखोंडेयांनी केले होते. या आंदोलनात दत्ता काकस,, दिपक रिंढे, शेख चाँद मुजावर,सुरेश सरकटे, जाकीर कुरेशी, राजू काटीकर, कांता चव्हाण, गौतम मोरे, संजयबाहेकर, शैलेश खेडेकर, सुनिल पनपालीया, एम.वाय. शेख यांच्यासह मोठ्यासंख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बंद एटीएमचे वाजत गाजत पुष्पहार घालून केले पूजन
By admin | Updated: April 29, 2017 14:56 IST