यामुळे आदिवासी बहुल असलेल्या गावाकडे ग्रामसेवकासह गटविकास अधिकारी आशिष पवार यांचेसुद्धा दुर्लक्ष होताना दिसत आहे. भोसा गावासाठी लाखो रुपये खर्च करून पिण्याचा पाण्याचा फिल्टर प्लँट उभारण्यात आला आहे. या फिल्टर प्लँटमधून फक्त दोनच दिवस पाणी आले असून तो दोनच दिवसात कायमचा बंद पडल्याने भोसा गावातील नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. भोसा येथे आदिवासी बहुल ग्रामपंचायत असताना सुध्दा या गावासाठी ग्रामसेवक नाही. भोसा गावाचा अतिरिक्त पदभार इतर ग्रामसेवकांकडे दिला जातो. भोसा गावात सध्या कोरोनाची भीती वाढली आहे. कोरोनाबाबत कोणतीही उपाययोजना ग्रामपंचायतमार्फत राबविली जात नाही. येथील आदिवासी बहुल जनतेला मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे भोसा ग्रामपंचायत विकासकामांना खीळ बसली असून गावात कोणतेच विकासकाम सुरू नाही. भोसा ग्रामपंचायतमध्ये तीन लाखांचा अपहार झाला असून याबाबत कोणतीच कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही. याबाबत गटविकास अधिकारी आशिष पवार यांना विचारणा केली असता आपण मिटिंगमध्ये आहे, असे सांगितले.
ग्रामसेवकाच्या दुर्लक्षामुळे रखडली कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:34 IST