शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हिवरा आश्रम ते दुधा रस्त्याचे काम लवकरच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:33 IST

हिवरा आश्रम येथून दुधा-ब्रह्मपुरी येथील श्री क्षेत्र ओलांडेश्वर संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला अनेक ...

हिवरा आश्रम येथून दुधा-ब्रह्मपुरी येथील श्री क्षेत्र ओलांडेश्वर संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला अनेक ठिकाणी वळणे आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी या रस्त्यावर येत असल्यामुळे या रस्त्याला खड्डे पडल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. दुधा-ब्रह्मपुरी येथील श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थानची ख्याती राज्यभर पसरली आहे. या संस्थावर महाशिवरात्रीदिवशी नऊ दिवसांचा मोठा उत्सव भरत असतो. याशिवाय श्रावण महिना अमावास्या, पौर्णिमा यासारख्या विविध दिवशी संस्थावर भाविकांची प्रचंड गर्दी असते. मात्र, या संस्थावर जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ या रस्त्यासाठी अनेकवेळा नागरिकांनी मागणी केली आहे. हिवरा आश्रम ते दुधा ही दोन पर्यटनस्थळे आहेत. या दोन्ही पर्यटनस्थळाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्याचे काम त्वरित व्हावे यासाठी पालकमंत्री यांच्याकडे जिल्हा परिषदेचे संजय वडतकर यांनी मागणी केली आहे. पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी तत्काळ खास बाब म्हणून पर्यटन निधीतून रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले आहे.

भाविकांना मिळणार दिलासा

हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर संस्थान हे दोन्ही पर्यटनस्थळ असल्याने पर्यटक निधीमधून निधी उपलब्ध झाल्यास या रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वास येणार आहे. हे दोन्ही रस्ते जोडले गेल्यास या ठिकाणी भाविकांसह पर्यटकांची गर्दी राहणार आहेत.(फोटो)