खामगाव (बुलडाणा): शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम त्यांनी मार्गी लागले आहे. या मार्गाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या उच्च अधिकार्यांच्या चमूने शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सर्वेक्षण केले. शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग अँथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर ब्राम्हणकर यांच्या चमूने आ. आकाश फुंडकर यांच्यासोबत टिळक पुतळा, नगर पालिका, महात्मा गांधी बगिचा, टॉवर चौक, तहसील, जलंब नाका, स्वामी सर्मथ संकुल, बटालियन, सुटाळा बु. ते मुख्य राष्ट्रीय महामार्गापर्यंंत पाहणी केली. त्यानं तर आमदार भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी ब्राम्हणकर यांनी या कामाबद्दल विस्तृत चर्चा केली. सर्वेक्षण झाल्याने या चौपदरीकरणाच्या कामाला तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळणार असून, लवकरच कामाला सुरवात होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी आ. अँड. फुंडकर यांनी दिली.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी
By admin | Updated: November 9, 2014 23:15 IST