शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी महिलांची पोलीस स्टेशनवर धडक

By admin | Updated: July 17, 2017 19:25 IST

वाघोळा येथील मातृशक्तीने एल्गार पुकारीत नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ यांच्या नेतृत्वात १७ जुलै रोजी दुपारी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनवर धडक दि

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : गावातील अवैधरित्या सुरु असलेल्या दारु विक्री विरुध्द वाघोळा येथील मातृशक्तीने एल्गार पुकारीत नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ यांच्या नेतृत्वात १७ जुलै रोजी दुपारी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनवर धडक दिली. त्यामुळे पोलीसांना वाघोळा येथे जाऊन दारु विक्रेत्याविरुध्द कारवाई करणे भाग पडले.दारुबंदीकरिता वाघोळा येथील मातृशक्तीने एकत्र येवून वाघोळा ते दसरखेड एमआयडीसी पो.स्टे.वर धडक दिली. या मोर्चात अ‍ॅड.रावळ, सरपंच बाळू पाटील, उपसरपंच नितीन पाचपोळ, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पाचपोळ, गजानन ठोसर, सुनिल बगाडे आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते. दरम्यान दसरखेड एमआयडीसी पो.स्टे. आवारात ठिय्या देत महिलांनी दारु विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा तो पर्यंत परत घरी जाणार नाही ही आक्रमक भूमिका घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली. यावेळी पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांनी महिलांची समजूत काढीत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व तात्काळ वाघोळा येथे पोलीस कर्मचाऱ्यांची चमू रवाना केली. पो.कॉ.संजय निंबोळकर, दिलीप रोकडे व आनंद माने यांच्या चमुने वाघोळा येथे जावून दिपक मोरे या दारु विक्रेत्यास २० देशी दारुंच्या बाटल्यांसह ताब्यात घेतले. तर पोपटराव मोरे यांच्या घरातून १२ देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.याबाबीची कुणकुण लागताच इतर तिघे दारु विक्रेते यांनी स्वत:च्या घराला कुलूप ठोकून पोबारा केला होता. दरम्यान सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास राष्ट्रवादीचे नेते संतोषराव रायपुरे यांनी भेट देत आपला पाठींबा दिला. आंदोलनात सुमनबाई कारंजकर, मिना मांडोकार, अनुसया मोरे, लताबाई बावीसआणे, तुळसाबाई तायडे, शांताबाई सोनोने, शिलाबाई बावीसआणे, यासह इतर महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.