शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:07 IST

मलकापूर : गावातील अवैधरीत्या दारु विक्री विरुद्ध वाघोळा येथील मातृशक्तीने एल्गार पुकारीत नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांच्या नेतृत्वात १७ जुलै रोजी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनवर धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : गावातील अवैधरीत्या दारु विक्री विरुद्ध वाघोळा येथील मातृशक्तीने एल्गार पुकारीत नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांच्या नेतृत्वात १७ जुलै रोजी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनवर धडक दिली, त्यामुळे पोलिसांनी वाघोळा येथे जाऊन दारु विक्रेत्याविरुद्ध कारवाई केली.दारुबंदीकरिता वाघोळा येथील मातृशक्तीने एकत्र येऊन वाघोळा ते दसरखेड एमआयडीसी पो.स्टे.वर धडक दिली. या मोर्चात अ‍ॅड.रावळ, सरपंच बाळू पाटील, उपसरपंच नितीन पाचपोळ, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पाचपोळ, गजानन ठोसर, सुनील बगाडे आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते. दरम्यान, दसरखेड एमआयडीसी पो.स्टे. आवारात ठिय्या देत महिलांनी दारु विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा तोपर्यंत परत घरी जाणार नाही, ही आक्रमक भूमिका घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांनी महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या व तत्काळ वाघोळा येथे पोलीस कर्मचाऱ्यांची चमू रवाना केली. पो.कॉं.संजय निंबोळकर, दिलीप रोकडे व आनंद माने यांच्या चमूने वाघोळा येथे जावून दीपक मोरे या दारु विक्रेत्यास २० देशी दारूच्या बाटल्यांसह ताब्यात घेतले, तर पोपटराव मोरे यांच्या घरातून १२ देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या.या बाबीची कुणकुण लागताच इतर तिघे दारु विक्रेते यांनी स्वत:च्या घराला कुलूप ठोकून पोबारा केला होता. दरम्यान, ठिय्या आंदोलनास राष्ट्रवादीचे नेते संतोष रायपुरे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. आंदोलनात सुमन कारंजकर, मीना मांडोकार, अनसूया मोरे, लता बावीसआणे, तुळसा तायडे, शांता सोनोने, शीला बावीसआणे यांसह इतर महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.