शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ युवतींची सुधारगृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:12 IST

खामगाव :   शेगाव शहरातील लॉजेसवर शनिवारी पोलिसांनी धाडी टाकून काही देह व्यापार करणार्‍या तर काही बेकायदा सोबत राहणार्‍या युवक- युवतींना ताब्यात घेतले होते. यामधील देहव्यापार करणार्‍या महिलेला न्यायालयाने जामिनावर सोडले होते, तर यातील दोन युवतींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही युवतींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.

ठळक मुद्देशेगाव येथील लॉजमध्ये अनैतिक देह व्यापार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :   शेगाव शहरातील लॉजेसवर शनिवारी पोलिसांनी धाडी टाकून काही देह व्यापार करणार्‍या तर काही बेकायदा सोबत राहणार्‍या युवक- युवतींना ताब्यात घेतले होते. यामधील देहव्यापार करणार्‍या महिलेला न्यायालयाने जामिनावर सोडले होते, तर यातील दोन युवतींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही युवतींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.१६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीला पोलिसांनी ८ लॉजेसवर छापे मारून अनैतिकरीत्या देहव्यापार करणार्‍या ५0 ते ६0 युवक व युवतींना पकडले. जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. शेगाव शहरातील लॉजेसमध्ये अनैतिक देह व्यापार होत असल्याची माहिती पोलिसांना खबर्‍याकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री शहरातील काही लॉजेसची झडती घेतली. झडतीमध्ये पोलिसांना २८ तरूण मुले व मुली अश्लील चाळे करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडून त्यांची कसून चौकशी केली. त्यामधील २८ मुलांवर कलम ११0 व ११७ अंतर्गत कारवाई केली तर २५ ते ३0 मुलींना समजपत्र देऊन सोडून देण्यात आले. मंदिर परिसरातील गोपाल गेस्ट हाऊसवर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गोपाल गेस्ट हाऊस येथे संजय मोहोड पाटील, गोपाल रमेश उमाळे रा.शेगाव हे चिखली येथील एका महिलेमार्फत मुलींना देहविक्रीचा व्यवसाय करण्यास लावून वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे दिसून आले.चिखली येथील मुलींचा पुरवठा करणारी एक ३४ वर्षाची महिला आढळून आली. तिला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर ती पोपटासारखी बोलू लागली व शेगाव येथील संजय मोहोड पाटील, गोपाल रमेश उमाळे यांच्या मार्फत गोपाल गेस्ट हाऊस येथे देहविक्रीकरिता  मुली पुरविण्याचे काम करते, असे तिने सांगितले. तसेच चिखली येथील २३ वर्षाची मुलगी व निमकर्दा येथील २५ वर्षाची मुलगी या दोघींच्या सांगण्यावरून या गेस्ट हाऊसवर आणल्याचे तिने कबूल केले. या माहितीवरून पोलिसांनी रूम नं.१0४,१0५ ची झडती घेतली असता दोघींसोबतही दोन जण अश्लील चाळे करताना आढळून आले. यावरून लॉजमालकासह त्या महिलेविरुद्ध पिटा अंतर्गत कारवाई करून रविवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली. सोमवारी या प्रकरणातील दोन्ही युवतींना हजर केले असता, दोघींची न्यायालयाने बुलडाणा येथील महिला सुधारगृहात रवानगी केली.