शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी सरसावल्या महिला

By admin | Updated: September 3, 2014 00:20 IST

चिखली तालुक्यातील सवणा ग्रामसभेत महिलांनी दारूबंदीसाठी ठराव घेतला आहे.

चिखली : सवणा गावात खुलेआम विकल्या जाणार्‍या दारुमुळे येथील महिलांनीएकत्र येत महिलांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतला आहे. गावात अवैधपणे दारू विक्री करणार्‍यांची जिल्हा पोलिस अधिक्षकासंह, चिखली पोलिस स्टेशन, विभागीय पोलिस आयुक्त व गृहमंत्री ना.आर.आर.पाटील यांच्याकडे तक्रार दिली आहे.तालुक्यातील सवणा येथे अवैध दारू विक्री होत असल्यामुळे काही महिलांचे पती व वयात आलेली मुले व्यसनाधीन झाले आहेत. शिवाय दारू पिऊन महिलांना मारहाण करणे आदी अत्याचार वाढले असून गावातील लग्न समारंभ इतर सार्वजनिक कार्यक्रमात भांडण-तंटे वाढले आहेत. तसेच जुगार व लुडो सारखे खेळ खेळण्याचा प्रकार वाढीला लागला आहे. असे असतानाही चिखली पोलिस स्टेशनचे याकडे दूर्लक्ष असल्यामुळे राजरोसपणे दारू विक्रीचा व्यवसाय होत असल्याचा आरोप महिलांनी तक्रारीत केला असून गाव दारूमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे व गावातील दारू विक्री व जुगार यावर पायबंद घालावा अशी मागणी केली आहे. या तक्रारीवर शकुंतलाबाई, आदमानेबाई, लिलाबाई धारे, सविता हाडे, सुनिता तायडे, केसरबाई गुरव, तारामती गायकवाड, मीरा गवारे, भिकाबाई चोपडे, रेणुका शिंदे, लिलाबाई सुलाखे, गयाबाई देव्हडे, गिता दातार आदी १३५ महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.