शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत वुमेन वारियर्स ऑन ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST

बुलडाणा : गत वर्षापासून काेराेनाचे संकट वाढल्याने आराेग्य विभागासह पाेलीस विभागावरील ताण वाढला आहे़ पुरुष पाेलीस कर्मचाऱ्यांबराेबरच महिला ...

बुलडाणा : गत वर्षापासून काेराेनाचे संकट वाढल्याने आराेग्य विभागासह पाेलीस विभागावरील ताण वाढला आहे़ पुरुष पाेलीस कर्मचाऱ्यांबराेबरच महिला पाेलिसांनाही कर्तव्य पार पाडावे लागत आहे. अने महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वुमेन वारियर्स रात्री उशिरापर्यंत ड्युटी करीत असून, लेकरांची काळजी वारंवार फोन करूनच घेत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्युटी देण्यात येत आहे. त्यांच्या ड्युटी नियमांमध्ये महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्युटी करणे अनिवार्य असल्याने या पोलीस अधिकारी व कर्मचारी लेकरांना घरी ठेवून रात्रीची ड्युटी प्रामाणिकपणे बजावत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस दलातील या वुमेन वारियर्सना ज्याप्रमाणे ड्युटी फर्स्ट ही काळजी आहे, तेवढीच काळजी कुटुंबातील सदस्याची असल्याचे त्यांनी सांगितले. या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी आधी ड्युटी योग्यरीत्या बजावतात आणि नंतरच कुटुंब व लेकरांचीही तेवढीच काळजी करीत असल्याची माहिती महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ड्युटीवर असतानाही मुलांची काळजी घेण्यासाठी त्या तत्पर असल्याचे महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कुटुंबाची काळजी मोबाइलवरूनच

वुमेन वारियर्स रात्रीची ड्युटी करीत असताना कुटुंबातील सदस्यांची काळजी मोबाईलवर संवाद साधून घेत आहेत. रात्रीतून दोन ते तीन वेळा घरी फोन करून त्या मुलांची व घरातील ज्येष्ठांची काळजी घेतात. काही महत्त्वाचे असेल तर मैत्रिणींची मदतही घेत असल्याची माहिती महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली.

पोलीस दलात दाखल होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. पोलीस अधिकारी असो किंवा कर्मचारी ड्युटी बजावणे म्हणजे मोठे आव्हानात्मक काम आहे आणि आव्हाने स्वीकारण्याची सवय लहानपणापासूनच असल्याने आता ड्युटी करताना एक वेगळा आनंद मिळतो.

- लता ससाने

पोलिसांच्या ड्युटीला काही वेळ नाही. घटना घडल्यानंतर किती दिवस त्या ठिकाणी ड्युटी बजावावी लागेल हे सांगता येत नाही. सुरुवातीला या बाबीचा त्रास झाला; मात्र आता पोलिसाची ड्युटी कितीही वेळ करण्याची सवय झालेली आहे आणि सुरक्षिततेसाठी ड्युटी करीत असल्याचे मोठे समाधान मनाला आहे.

- सुनीता येळवंडे/पठारे,

नागरिकांच्या सुरक्षेसाठी ड्युटी करणे गौरवाचे कार्य आहे. एक महिला पोलीस असतानाही आपण कुटुंबासोबतच नागरिकांच्या मनातही सुरक्षित भावना निर्माण करीत आहोत, ही माझ्यासाठी मोठी बाब आहे.

- वर्षा कांगणे

सण-उत्सवामध्ये आई घरी नसल्याचे अनेकदा आम्ही अनुभव घेतले आहेत. त्यामुळे मोठा सण उत्सव असताना आई घरी नसणे म्हणजे मोठी दुःखाची बाब आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमची आई रस्त्यावर बंदोबस्तात उभी आहे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

नैतिक दत्तात्रय पठारे

खून, चोरी, महिलांवरील अत्याचार यासारख्या घटना घडल्यानंतर आमची आई तपास करते. त्या पीडित महिलांना न्याय देण्याचे काम करते. पोलीस ड्युटी बजावताना रात्रंदिवस कार्यरत असते. हे आमच्यासाठी प्रेरणादायी असून, आमच्या आयुष्याला एक चांगले वळण देण्यासाठी खूप मोठी प्रेरणा आमच्या आईकडूनच मिळत आहे.

प्रणिती रणधीर गवई

आईची रात्री ड्युटी असताना खूप काळजी वाटायची. काही वेळा तर रात्रीला झोपही यायची नाही. लहानपणापासून आईची सवय असल्यामुळे आई बाहेर जाताच झोपेतून जाग यायची. आई मोबाईलवरून संभाषण करून धीर द्यायची; मात्र आता आई ड्युटीवर असल्याचे समाधान आहे. आणि आम्हालाही सवय झाली आहे.

वेदांत शिवदत्त वारे