बुलडाणा : लोकमत सखी पुरवणीमध्ये गुरूवारी गोदरी मुक्तीचा लढा, यासंदर्भा तील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस् थेमध्ये जमलेल्या महिलांनी पुरवणीचे सामूहिक वाचन केले व यापुढे उघड्यावर बसायचे नाही, शौचालय उभारायचे, अशी शपथ घेतली.केंद्र व राज्य सरकार तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था चालविली जाते. या संस्थेमध्ये महिलांच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जात असून, सध्या ३५ महिला प्रशिक्षणात सहभागी आहेत. गुरूवारी सखी पुरवणीमध्ये ह्यगोदरी मुक्तीचा लढाह्ण या विषयावर महिलांनी उभा केलेला आदर्श वाचून प्रशिक्षणातील अनेक महिला भारावून गेल्या. महिलांमधील ही उत्सुकता पाहून या शिबिराचे प्रशिक्षक व समन्वयक चंद्रशेखर केणे यांनी संस् थेचे संचालक पी.एन.सावजी यांच्याशी चर्चा केली व सर्व महिलांसाठी स्वतंत्रपणे लोकमत खरेदी करून प्रत्येकीला सखी पुरवणीचे वितरण केले.यावेळी केणे यांनी तत्काळ शपथपत्र तयार करून सर्व महिलांना उघड्यावर शौचविधीस न जाता यापुढे शौचालय उभारणीसाठी प्रयत्न करीन, अशी शपथ दिली. शिबिरातील मुक्ता बोराळे, नंदा खंडारे, फरजाना बी शे.सिराज, शाहिन बी शेख आरीफ, हर्षदा सुरडकर, मंठाबाई आबाराव हिवाळे या महिलांनी आपले अनुभव कथन केले.शिबिरातील ११ महिलांकडे शौचालय नाहीत. त्यांनी आता शौचालय उभारणीसाठी संकल्प केला असून, येणार्या काही दिवसात तो प्रत्यक्षात उ तरविण्याचा निर्धारही केला आहे.
शौचालय बांधण्याची महिलांनी घेतली शपथ
By admin | Updated: November 20, 2014 23:30 IST