८ मार्च रोजी स्वामी समर्थ मंदिर परिसरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी त्या बाेलत हाेत्या. अध्यक्षस्थानी सायली सावजी तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी आखाडे, वैशाली फिसके, रिजवाना खान आदी उपस्थित होत्या. यावेळी नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्या सौनाली आखाडे, नंदा लांभाडे, सिंधू खोडके, पूजा साखळकर, फरजानाबी शाह यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन साक्षी आखाडे तर आभार प्रदर्शन जया आखाडे यांनी मानले. यशस्वितेसाठी दीपाली आखाडे, शोभा वानखेडे, उज्ज्वला आखाडे, इंगळे, संस्कृती आखाडे, सुरेखा परमाळे, दीपाली आखाडे आदींनी परिश्रम घेतले.
महिलांनी संघटित होऊन सामाजिक कार्यात अग्रेसर व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:34 IST