शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी केले पालिकेत ठिय्या आंदोलन

By admin | Updated: September 21, 2016 02:53 IST

बुलडाणा येथील शासकीय निवासस्थानात घाणीचे साम्राज्य.

बुलडाणा, दि. २0 - येथील शासकीय निवासस्थान परिसरात सर्वत्र घाण पसरली आहे, पावसाळयाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाली नसल्याने नाल्याचे पाणी घरासमोर साचत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहे. वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याने या इमारतीतील महिलांनी सोमवारी दुपारी पालिकेत ठिया आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा महिला कांग्रेस कमिटीच्या सरचिटणीस नंदिनी टारपे यांनी केले. या निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील अनेक भागातील नियमित साफसफाई करण्यासाठी कोणताही कर्मचारी येत नाही. अनेक वेळा हेल्पलाईन वर तक्रार करुनही कोणी दखल घेत नाही. संबंधित कार्यालयास भेट दिली असता तेथील कर्मचारी हा परिसर बांधकाम विभागाचा असल्याचे सांगतात. निवडणुकी दरम्यान पालिकेतील सर्वच उमेदवार या ठिकाणी मतदान मागण्यासाठी येतात मात्र काम सांगितले असता उडवा उडवीची उत्तरे देतात. या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे, या घाणी मुळे रोगराई, आजार वाढू शक तो, लवकरच महालक्ष्मी, दसरा आदी सारखे सण आहेत त्यामुळे परिसरत तत्काळ साफ सफाई करण्यात यावी अशी मागणी येथील महिलांनी केली.यावेळी पालिका प्रशासन विभागात उपस्थित देशपांडे यांनी आठ दिवसात समस्या सोडविण्याचे आश्‍वासन महिलांना दिले. यावेळी जिल्हा महिला कांग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीस नंदिनी टारपे, पंचशिल खरात, संगीता बोराडे, अर्चना माठे, उषा जाधव, शितल जोशी, दुर्गा डाबेराव आदी उपस्थित होत्या.